आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘वीजनिर्मिती केंद्राला वाण धरणातून पाणी सोडावे’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गेवराई- परळी औष्णिक वीजनिर्मिती केंद्रास वाण धरणातून पाणी सोडून वीजनिर्मिती सुरू करण्याची मागणी आमदार अमरसिंह पंडित, आमदार पृथ्वीराज साठे यांनी राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्याकडे केली.
बीड जिल्ह्याच्या दुष्काळी परिस्थितीबाबत आमदार पंडित यांनी राज्यपालांची भेट घेऊन चर्चा केली. राज्यपालांनी याबाबत वेळ दिला होता. जिल्ह्यातील गेवराई तालुका कायम दुष्काळग्रस्त असून दुष्काळाच्या निर्मूलनासाठी प्रस्तावित केलेले दहा मोठे सिंचन प्रकल्प होणे गरजेचे आहे. 250 हेक्टर क्षमतेपेक्षा अधिक मोठ्या प्रकल्पावरील निर्बंध उठवून 46 कोटी रुपये किमतीच्या प्रकल्पांना विशेष बाब म्हणून मान्यता देण्याची मागणी करण्यात आली. परळी वीजनिर्मिती प्रकल्प बंद असल्याने शासनाचे दररोज 12 कोटी रुपयांचे नुकसान होत असून राज्यातील भारनियमन व महागडी वीज खरेदी लक्षात घेऊन नागापूर येथील वाणधरणातील पाणी वीजनिर्मिती प्रकल्पाला द्यावे, अशी मागणी त्यांनी केली. या वेळी राज्यपालांनी आमदार पंडित यांच्या सूचना ऐकून घेण्यासाठी 45 मिनिटे वेळ दिला. सिंचन प्रकल्पाच्या संदर्भात शासनाशी चर्चा करून 50 पैशांपेक्षा कमी पैसेवारी असलेल्या तालुक्याबाबत विशेष बाब म्हणजे सिंचन प्रकल्पाला मंजुरी देण्याविषयी कार्यवाहीचे संकेत त्यांनी दिले.