आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परळीच्या डॉ. रंजना घुगे यांना २ वर्षे सक्तमजुरी, सोनोग्राफी केंद्रातील एफ फाॅर्म अर्धवट भरले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - सोनोग्राफी केंद्रात एफ फॉर्म अर्धवट भरल्याप्रकरणी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एच. जे. पठाण यांनी बुधवारी माउली हॉस्पिटलच्या डॉ.रंजना घुगे यांना दोषी ठरवत दोन वर्षांची सक्तमजुरी व १० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. परळीत २०११ मध्ये १२ सोनोग्राफी सेंटरची अचानक तपासणी झाली होती.

शहरातील शिवाजी चौकात माउली हॉस्पिटलमध्ये १४ जून २०११ रोजी सायंकाळी चार वाजता तहसीलदार शरद झाडके व पुण्याचे डॉ. महेंद्र अहिरावले, तत्कालीन तहसीलदार श्रीरंग मुंडे, कैलास कुलकर्णी, अप्पाराव ढोकळे या पथकाने भेट देऊन सोनोग्राफी केंद्राची तपासणी केली होती. तपासणीत डॉ. घुगे यांनी एफ फाॅर्म पूर्णपणे भरलेले नव्हते. त्यामुळे सोनोग्राफी मशीन व एफ फॉर्मचे अभिलेखे जप्त केले होते. या प्रकरणी २० जुलै २०११ रोजी तहसीलदार शरद झाडके यांनी परळी न्यायालयात तक्रार दाखल केली. यावर न्यायालयाने डॉ. घुगे यांना दोषी ठरवले.