आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामस्थांनी ठोकले वीज उपकेंद्राला टाळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परंडा - तालुक्यातील राजुरी, घारगावात मागील पाच दिवसांपासून विद्युतपुरवठा खंडित असूनही महावितरणने दुर्लक्ष केल्याने संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी (दि. ५) जवळा (नि) येथील ३३ के. व्ही. वीज उपकेंद्रला टाळे ठोकले.

महावितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तसेच अनेकवेळा विनंती करूनही दखल घेतली जात नव्हती. यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी जवळा येथील महावितरण उपकेंद्रातून होणारा विद्युतपुरवठा बंद करून कार्यालयास टाळे ठोकले. शेतकऱ्यांच्या पीक नुकसानीस जबाबदार कोण, असा प्रश्न शेतकऱ्यांनी विचारला. परंतु महावितरणचा एकही अधिकारी तास अंदोलनाकडे फिरकला नाही. शेतकऱ्यांनी संताप व्यक्त करीत कार्यालयास ठाळे ठोकले. महावितरणन अधिकाऱ्यांनी विद्युत पुरवठा सुरळीत करण्याच्या मागणीचे निवेदन कार्यालयाच्या भिंतीवर डकवले. या वेळी परिसरातील २०० शेतकरी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...