आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

परभणी बॉम्बस्फोट : चारही आरोपींची निर्दोष मुक्तता

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - शहरातील मोहमदीया मशिदीतील २००३ मध्ये झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणातील चारही आरोपींची सबळ पुराव्याअभावी संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्तता करण्यात येत असल्याचा निकाल जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती एम.एस.जवळकर यांनी गुरुवारी (दि.१८) दिला.
यामध्ये राकेश दत्तात्रय धावडे, संजय विठ्ठल चौधरी, मारोती केशव वाघ व योगेश रवींद्र देशपांडे या चौघांची निर्दोष मुक्तता झाली आहे. संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेल्या या प्रकरणाची अंतिम टप्प्यातील सुनावणी बुधवारपासून सलग दोन दिवस चालली. गुरुवारी सायंकाळी पाचच्या सुमारास निकाल घोषित करण्यात आला. सुनावणीदरम्यान जिल्हा न्यायालयाच्या परिसरात मोठा कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

शहरातील रहेमतनगरातील मोहमदीया मशिदीत २१ नोव्हेंबर २००३ रोजी रमजान महिन्यात दोन स्फोट झाले होते. शुक्रवारची मोठी नमाज मशिदीत झाल्यानंतर पावणेदोनच्या सुमारास मोठ्या आवाजातील दोन स्फोट पाठोपाठ झाले होते. त्यामुळे मशिदीत मोठा धूर होवून एकच गदारोळ उडाला. या स्फोटात ३० ते ३५ जण जखमी झाले होते. जखमींवर तातडीने येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले होते. त्यातील गंभीर जखमी असलेल्या अब्दुल समद अब्दुल जब्बार हा २७ नोव्हेंबर रोजी हैदराबाद येथील रुग्णालयातील उपचार सुरू असताना मृत्यू पावला होता. स्फोटाच्या घटनेनंतर शहरात जाळपोळीचे, दगडफेकीचे प्रकार घडले. तणावाचे वातावरण निर्माण झाले

होते. याप्रकरणी मोहमदीया मशिदीचे इमाम अब्दुल खदीर शेख जाकीर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. कलम ३०२, आर्म्स अॅक्ट आदी कलमांनुसार गुन्हे दाखल झाले होते. याप्रकरणात पोलिसांनी केलेल्या तपासात संजय विठ्ठल चौधरी याला १२ जून २००६ रोजी अटक करण्यात आली तर मारोती केशव वाघ व योगेश रवींद्र देशपांडे यांना संशयित म्हणून १२ सप्टेंबर २००६ रोजी अटक करण्यात आली.

न्यायालयाच्या आवारात चोख पोलिस बंदोबस्त
बुधवारी सुनावणी अंतिम टप्प्यात असल्याने या राकेश धावडे वगळता तिघांना जिल्हा न्यायालयात आणण्यात आले होते. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र, दिवसभर कामकाज चालल्यानंतर गुरुवारी पुढील प्रक्रिया करण्यात येणार असल्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती जवळकर यांनी स्पष्ट केले. त्याप्रमाणे गुरुवारी सकाळी अकरा वाजल्यापासून प्रक्रियेला सुरुवात झाली. राकेश धावडे हा तळोदा (मुंबई) पोलिसांकडे असल्याने हजर राहू शकला नाही. उर्वरीत तिघांच्या उपस्थितीत सायंकाळी निकाल जाहीर झाला. या चौघांना संशयाचा फायदा देवून निर्दोष मुक्त करण्यात येत असल्याचा निकाल जवळकर यांनी दिला. या चौघांकडून ५० हजार रुपयांचा सॉल्व्हसी बॉण्ड घेण्यात आला.

न्याय प्रक्रिया पूर्ण
मोहमदीया मशिदीतील स्फोट प्रकरणात सरकारी पक्षाकडून सबळ पुरावे दाखल होवू शकले नाहीत. ५१ साक्षीदार तपासल्यानंतर झालेल्या युक्तिवादानंतर न्याय प्रक्रिया पूर्ण होवून चौघांनाही सबळ पुराव्याअभावी संशयाचा फायदा देवून निर्दोष मुक्त करण्यात आले आहे.
- अँड.नितीन रुणवाल
बातम्या आणखी आहेत...