आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पडताळणीत परभणीतील आठ ग्रंथालये बंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - महसूल प्रशासनाच्या वतीने करण्यात आलेल्या शासकीय व अनुदानित ग्रंथालयाच्या पडताळणीत जिल्ह्यातील आठ ग्रंथालये बंद दिसून आली असून अनेक ग्रंथालयांमध्ये त्रुटी आढळल्या आहेत.
21 ते 25 मेदरम्यान जिल्ह्यातील 413 ग्रंथालयाची पडताळणी केली. 27 पथकांनी पडताळणी केली. ग्रंथ, वृत्तपत्र, नियतकालिके, वर्गणीदार, बाल व महिला विभाग आदी 15 निकषांची तपासणी करण्यात आली. जिल्ह्यात सर्वाधिक ग्रंथालयांची संख्या परभणी तालुक्यात 86 असून गंगाखेड 62, पूर्णा 62, जिंतूर 67, मानवत 20, सोनपेठ 22, सेलू 34 पाथरी 28, पालम अशी 32 ग्रंथालये आहेत.
सेलू तालुक्यातील वाल्मीकेश्वर सार्वजनिक वाचनालय वालूर, पूर्णा तालुक्यातील छत्रपती शिवराय वाचनालय, महारुद्र सार्वजनिक वाचनालय, राजेसंभाजी सार्वजनिक वाचनालय, गंगाखेड तालुक्यातील विवेकानंद सार्वजनिक वाचनालय, पाथरी तालुक्यातील शहीद भगतसिंग सार्वजनिक वाचनालय, जिंतूर तालुक्यातील परिवर्तन सार्वजनिक वाचनालय, तर मानवत तालुक्यातील स्वामी विवेकानंद
सार्वजनिक वाचनालय अशी एकूण आठ वाचनालये पडताळणीच्या वेळी बंद दिसून आली, तर जिल्ह्यातील सात वाचनालयांमध्ये कमी ग्रंथ, 37 वाचनालयांत कमी वृत्तपत्रे, 115 मध्ये कमी नियतकालिके असल्याचे निदर्शनास आले.
25 वाचनालयात निकषापेक्षा वर्गणीदारांची संख्या कमी, तर 69 वाचनालयात पुरेसे कर्मचारी नव्हते. 20 वाचनलयाकडे बाल व महिला या स्वतंत्र विभागांसाठी जागा नव्हती.