आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणीच्या महापौरपदी वडकर, उपमहापौरपदी वाघमारे निश्चित

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - महापौरपदासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या संगीता राजेंद्र वडकर तर उपमहापौरपदी काँग्रेसचे नेते भगवान वाघमारे या दोघांचेच अर्ज दाखल झालेले असल्याने या दोघांचीही बिनविरोध निवड झाली असून याबाबतची औपचारिक घोषणा बुधवारी (दि.पाच) होणार आहे.
जिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी एस. पी. सिंह यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी दुपारी दोन वाजता बी.रघुनाथ सभागृहात महापौर व उपमहापौरपदाच्या निवडीसाठी विशेष सभा बोलाविण्यात आली असून या दोन्ही पदांसाठी प्रत्येकी एकेकच अर्ज दाखल झाला असल्याने जिल्हाधिकारी सिंह त्यांच्या निवडीची जाहीर घोषणा करतील. या निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही काँग्रेस महापालिकेत एकत्र आल्याचे चित्र समोर आले असून या दोन्ही पक्षांच्या सदस्यांचे संख्याबळ तगडे असल्याने सभागृहात ठराव घेताना ते पूर्णपणे पारित होणार आहेत.
मागील अडीच वर्षांत काठावरचे बहुमत असलेल्या राष्ट्रवादीने संपूर्ण सत्ता हस्तगत करण्यासाठी काँग्रेसला दूर ठेवून भाजपच्या दोघा व एका अपक्षाच्या सहकार्याने सत्तेची खुर्ची मिळविली होती. पहिले महापौरपद प्रताप देशमुखांनी तर उपमहापौर सज्जुलाला या दोघा राष्ट्रवादीच्या नेत्यांनी उपभोगले. त्यावेळी काँग्रेस विरोधी पक्षाच्या बाकावर बसून होती. शिवसेनेचीही तीच स्थिती होती. मात्र, या वेळी नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दलबदलू नेत्यांमुळे दोन्ही काँग्रेसला एकत्र येण्याची वेळ आली. निवडणुकीत दोन्ही काँग्रेसने एकमेकांच्या विरोधात निवडणूक लढविली. दोन्ही काँग्रेसच्या उमेदवारांचे डिपॉझिटही जप्त
झाले होते.