आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parbhani MLA Jadhav Get Three Month Life Imprsonment

परभणीचे आमदार जाधव यांना सक्तमजुरी,शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपा

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी - शासकीय कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरून येथील शिवसेनेचे आमदार संजय ऊर्फ बंडू जाधव यांना न्यायालयाने शुक्रवारी तीन महिने सक्तमजुरी व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.


वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता कार्यालयात जाधव आणि वीज कंपनीच्या अधिका-यांत तीन वर्षांपूर्वी वाद झाला होता. तालुक्यातील मुरुंबा येथील शेतक-यांना विद्युत रोहित्र देण्यास अडवणूक होत असल्याने आमदार जाधव यांनी संबंधित अभियंत्यांशी मोबाइलवरून संपर्क साधला; परंतु अभियंत्याने समाधानकारक उत्तरे दिली नाहीत. त्यामुळे आमदार जाधव शेतक-यांसह वीज कंपनीच्या कार्यालयात गेले. अभियंत्यासोबत त्यांची जोरदार बाचाबाची झाली. याप्रकरणी आमदार जाधव यांच्याविरोधात कोतवाली पोलिस ठाण्यात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला. आरोपपत्रात जाधव यांच्यावर गंभीर आरोप होते.