आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महापालिकेच्या वाहनचालकांचे परभणीत बेमुदत उपोषण सुरू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- महापालिकेतील कायम घंटागाडीचालक व वाहनचालकांना पूर्वीप्रमाणे वाहने परत देण्यात यावीत, या मागणीसाठी वाहनचालकांनी सोमवारपासून (दि. 29) बेमुदत उपोषणास सुरुवात केली. मनपा कामगार कर्मचारी युनियनचे लाल बावटाचे नेते कॉ. राजन क्षीरसागर यांच्या नेतृत्वाखाली कामगारांनी हे आंदोलन सुरू केले.

कायम वाहनचालक व घंटागाडीचालकांची वाहने महापालिका प्रशासनाने परत घेतली होती. ती वाहने या कामगारांना देण्यात यावीत, या मागणीसाठी या कामगारांनी 20 एप्रिल रोजी प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यासाठी आंदोलनाचा इशाराही दिला होता, परंतु पालिका प्रशासनाने संघटनेस कोणत्याही प्रकारचे उत्तर दिले नाही. त्यामुळे लाल बावटा संघटनेच्या पुढाकाराने या सहा कायम वाहनचालकांनी सोमवारी महापालिका कार्यालयासमोर बेमुदत उपोषणास सुरुवात केली आहे. मागण्या मान्य होईपर्यंत हे आंदोलन सुरू राहील.

यादरम्यान उपोषणार्थींच्या आरोग्यास हानी झाल्यास त्याची जबाबदारी मनपा प्रशासनावर राहील, असा इशाराही लाल बावटा संघटनेचे नेते राजन क्षीरसागर यांनी दिला आहे. उपोषणार्थींमध्ये श्रावण राधाजी कदम, जयकुमार मकरंद, पिराजी बोराडे, आश्रोबा गायकवाड, रामा गायकवाड, रामा विठ्ठल घाटगे, विजयानंद मोकिंद साळवे यांचा समावेश आहे.