आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parbhani, Nanded Officers Not Behave In Division Sports And Cultural Competation At Beed

विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांच्या समारोपाला परभणी, नांदेडच्या अधिका-यांची धुडगूस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - महसूल कर्मचार्‍यांच्या विभागीय क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांच्या उद्घाटनापासून यजमान बीडचे वाभाडे काढणार्‍या परभणी, नांदेड जिल्ह्यातील महसूल अधिकारी, कर्मचार्‍यांनी समारोपाला स्वत:च्या खात्याचे राज्यमंत्री, विभागीय आयुक्तांसमोर धुडगूस घातला. सांस्कृतिक कार्यक्रमात दारूच्या नशेत धिंगाणा घालणार्‍या कर्मचार्‍यांनी समारोपालाही तमाशा केला !
बीडमध्ये आयोजित स्पध्रेला गोंधळाचे गालबोट लागले. परभणी, नांदेडच्या कर्मचार्‍यांनी बक्षीस वाटपात पक्षपातीपणा झाल्याचा आरोप करत पारितोषिके परत केली व गोंधळ घातला. महसूल कर्मचारी संघटना नांदेडचे जिल्हाध्यक्ष लक्ष्मण नरमवार यांनी पुनरावलोकन व्हावे, अशी आग्रही मागणी केली. मात्र, जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी ती फेटाळली. महसूल खात्यात विभागीय पातळीवर क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा होतात. यंदा मराठवाडा विभागीय स्तरावरील स्पर्धांचे यजमानपद बीड जिल्ह्याकडे होते. जिल्हाधिकारी नवलकिशोर राम, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या नेतृत्वाखालील टीमने मराठवाड्यातील अधिकारी, कर्मचार्‍यांची बडदास्त ठेवली. तरीही स्पर्धेत गोंधळ झालाच.