आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parbhani Solider Killed In Jammu Kashmir, Divya Marathi

परभणीचा जवान अक्षयकुमार शहीद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - जम्मू-काश्मीरमध्ये भारत-पाक सीमेवर देशासाठी कर्तव्य बजावत असताना परभणीचा जवान अक्षयकुमार सुधाकर गोडबोले हा अतिरेक्यांनी पेरून ठेवलेल्या आयईडीच्या स्फोटात शनिवारी शहीद झाला. त्याचे पार्थिव विमानाने पुणेमार्गे रविवारी (दि.पाच) मध्यरात्री परभणीत दाखल होईल. सोमवारी सकाळी नऊ वाजता शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.

वांगी रस्त्यावरील हर्षनगरातील रहिवासी असलेला अक्षयकुमार (२१) हा केवळ दीड वर्षापूर्वीच भारतीय सैन्यदलात दाखल झाला होता. त्याचे वडीलही सेवानिवृत्त जवान आहेत. कुटुंबातच देशभक्तीचा वारसा लाभलेला अक्षय देशसेवेसाठीच शहीद झाला. तो जम्मू काश्मिरात भारत-पाक सीमेवर मेंढार प्रांतातील बलनोई येथे सायंकाळी गस्त घालत होता. त्या वेळी अतिरेक्यांनी पेरून ठेवलेल्या स्फोटकांचा स्फोट झाला. त्यात अक्षयसह शुभम खादतकर हे दोघे गंभीर जखमी झाले. उपचारासाठी दवाखान्यात नेण्यात येत असताना वाटेतच अक्षयने प्राण सोडला. सोमवारी सकाळी नऊ वाजता पोलिस दलाच्या वतीने त्याला सलामी देऊन आदरांजली वाहण्यात येणार आहे. त्यानंतर धार रस्त्यावरील स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.