आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Parbhani Zp Exam Student Aggressive Administration Against

विध्‍यार्थ्‍यांच्‍या आक्रमक पवित्र्याने प्रशासन नमले; संतप्त परीक्षार्थींचा परीक्षा देण्यास नकार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - जिल्हा परिषदेच्या परिचरपदाच्या भरतीसाठी लेखी परीक्षेदरम्यान परीक्षा केंद्रांवर आलेल्या प्रश्नपत्रिका सीलबंद पाकिटांत नसल्याने संतप्त परीक्षार्थींनी परीक्षा देण्यास नकार देत मोठा गोंधळ घातला.
हजारो परीक्षार्थींनी रस्त्यावर येत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर तब्बल दोन तास रास्ता रोको केला. संतप्त परीक्षार्थींना हटवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या सौम्य लाठीमारात एक जण जखमी झाला. दरम्यान, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुंबरे यांनी नजरचुकीने पाकिटे सीलबंद करण्याचे राहिल्याचे नमूद करीत हात झटकण्याचाच प्रकार करीत परीक्षाच रद्द झाल्याचे जाहीर केले.
जिल्हा परिषदेच्या परिचरपदाच्या १९ जागांसाठी रविवारी शहरातील ४७ परीक्षा केंद्रांवरील ४३० खोल्यांतून दुपारी दोन वाजता परीक्षा घेण्यात येणार होती. त्याप्रमाणे जवळपास ११ हजारांवर परीक्षार्थी राज्यभरातून शहरात दाखल झाले होते. परीक्षेला सुरुवात होण्यापूर्वीच काही परीक्षा केंद्रांवर आलेली प्रश्नपत्रिकेची पाकिटे सीलबंद नसल्याचे पर्यवेक्षकांच्या निदर्शनास आले. त्यांनी विद्यार्थ्यांची त्यावर स्वाक्षरी घेण्याचा प्रयत्न केला असता परीक्षार्थींनी त्यास नकार देत पेपर आधीच फुटल्याची शंका घेतली. पर्यवेक्षकांनीही पाकिटे सीलबंद नसल्याचे लिहून दिले. त्यामुळे विद्यार्थ्यांचा रोष वाढला. शहरातील अनेक केंद्रांवर असा प्रकार झाल्यानंतर परीक्षार्थींनी धुडगूस घालण्यास सुरुवात केली. परीक्षाच उधळून संतप्त उमेदवारांनी गटागटाने जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो उमेदवार दाखल झाले. जिल्हाधिकारी राहुल रंजन महिवाल हे कार्यालयात नसल्याने संतप्त उमेदवारांनी मुख्य रस्त्यावरच ठाण मांडून दोन तास रास्ता रोको आंदोलन केले.

काही उमेदवारांनी जिल्हा परिषदेतही प्रवेश करून मोठा गोंधळ घातला. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकारी सुभाष डुंबरे यांची भेट त्यांना होऊ शकली नाही. अखेर दोन तास विद्यार्थ्यांचा हा प्रकार सुरूच होता. यादरम्यान, खासदार संजय जाधव, आमदार डॉ.राहुल पाटील हेही शिवाजी पुतळ्याजवळ दाखल झाले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गंगाधर जवंजाळ, सुमीत परिहार, तालुकाध्यक्ष विजय भुमरे यांनीही परीक्षार्थींचे नेतृत्व करीत जिल्हाधिकारी कार्यालयावर ठाण मांडून झाल्या प्रकाराचा निषेध केला.

वसमत रस्त्यावर वाहतूक ठप्प
शिवाजी पुतळ्याजवळ पाचशे ते सहाशे परीक्षार्थींनी ठाण मांडल्याने वसमत रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. खा.जाधव, आ.डॉ.पाटील हे आल्यानंतर विद्यार्थ्यांचे आंदोलन अधिक तीव्र झाले. याची दखल घेऊन पोलिस अधीक्षक कार्यालयातून प्रभारी पोलिस अधीक्षक अमोघ गावकर, निरीक्षक संजय हिबारे, निरीक्षक जगताप, निरीक्षक सुधाकर रेड्डी यांच्यासह मोठा पोलिस फौजफाटा दाखल झाला. शिवाजी पुतळ्यापासून त्यांनी परीक्षार्थींच्या जमावाला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर नेले. परंतु तेथेही परीक्षार्थी हटत नसल्याने पोलिसांनी सौम्य लाठीमार करूनच जमावाला पांगवले. यात दत्ता जगताप नावाचा परीक्षार्थी जखमी झाला. काही परीक्षार्थींना मार खाण्याची वेळ आल्याने उमेदवार संतप्त झाले होते.

पुढील स्‍लाइडवर वाचा नजरचुकीने झाला प्रकार...