Home | Maharashtra | Marathwada | Other Marathwada | Parbhanis Dara Singh Khurana in Mr. India Internationa competition

परभणीचा दारासिंह खुराणा मिस्टर इंडिया इंटरनॅशनलमध्ये, 6 वर्षांच्या मेहनतीला मिळाले यश

प्रवीण देशपांडे | Update - Aug 26, 2017, 03:00 AM IST

ईत दाखल होत तब्बल सहा वर्षांच्या खडतर मेहनतीने येथील दारासिंह राकेश खुराणा (२५) या युवकाने वेगळी वाट चोखळताना यशाची शिखर

 • Parbhanis Dara Singh Khurana in Mr. India Internationa competition
  परभणी - परभणीसारख्या भागातून मॉडेलिंगच्या क्षेत्रात करिअर करण्यासाठी थेट मुंबईत दाखल होत तब्बल सहा वर्षांच्या खडतर मेहनतीने येथील दारासिंह राकेश खुराणा (२५) या युवकाने वेगळी वाट चोखळताना यशाची शिखरे पादाक्रांत करण्यास सुरुवात केली. रविवारी (दि.२७) होणाऱ्या मिस्टर इंटरनॅशनल इंडिया या स्पर्धेत त्याचा सहभाग राहणार आहे.
  या स्पर्धेतून विजेत्या स्पर्धकाचा मिस्टर इंटरनॅशनल २०१८ या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत जगातील ४० देशांमधील स्पर्धकांमध्ये सहभाग राहणार आहे. त्यादृष्टीने दारासिंह खुराणाची ही वाटचाल वाखाणण्याजोगी आहे. परभणी शहरातील पंजाब हँडलूमचे संचालक राकेश खुराणा यांचा मुलगा असलेला दारासिंह याला लहानपणापासूनच स्टेज करेज होते. येथील क्वीन्स इंग्लिश स्कूलमध्ये दहावीपर्यंतचे शिक्षण घेताना त्याने आठवीमध्ये असताना ‘मिस्टर परभणी’ या स्पर्धेत यश संपादन केले. त्याचवे ळी त्याला आपण मिस्टर इंडियाच्या दृष्टीने तयारी करावी अशी स्वप्ने पडू लागली. ते स्वप्न प्रत्यक्षात आणण्यासाठी त्याची वाटचाल सुरूच राहिली.

  पुण्यात सिम्बायोसिसमध्ये अकरावी केल्यानंतर त्यादृष्टीने तो बारावीपासून मुंबईतील एच. आर. कॉलेजमध्ये वाणिज्य शाखेला प्रवेशकर्ता झाला. याच महाविद्यालयातून त्याने वाणिज्य शाखेची पदवी व पदव्युत्तर पदवी एमकॉम मिळवली. विलेपार्ले येथील नरसी मोहनजी महाविद्यालयातून एमबीएदेखील पूर्ण केले. पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करतानाच त्याने आपल्या स्वप्नाकडे दुर्लक्ष केले नाही. सातत्याने विविध स्पर्धांतून सहभाग नोंदवला.

  ध्येयपूर्तीसाठी कठोर मेहनत : दारासिंह खुराणा
  शाळेपासूनच मला अभिनय व नृत्याची आवड होती. परभणीमधील स्पर्धेने याच क्षेत्रात करिअर करावयाचे ठरवले. मुंबईत दाखल झाल्यानंतर आपल्यातील न्यूनगंड दूर करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू केले. अडचणी आल्या, परंतु अभ्यास करतानाही मॉडेलिंग व वेगवेगळ्या इव्हेंट्समधील सहभाग सातत्याने ठेवला. फॅशन शोमधील स्पर्धांसाठी सर्वच प्रकारची विशेषता लाइफस्टाइलवर भर द्यावा लागतो. डायट मेंन्टेनन्ससह कम्युनिकेशन स्किलवर भर द्यावा लागतो. प्रत्येक गोष्ट बारकाईने लक्षात घ्यावी लागते असे नमूद करताना दारासिंह म्हणाला, या प्रवासात भेटलेल्या प्रत्येकाकडून काही ना काही शिकायला मिळाले. त्यातूनच आपल्यातील सुधारणा सातत्याने घडत गेल्या. कठोर मेहनत घ्यावी लागली. यातूनच ऑल इंडियात विविध ठिकाणी झालेल्या ऑडिशनमधून मुंबई केंद्रातून आपली मिस्टर इंटरनॅशनल इंडिया या स्पर्धेसाठी पहिल्या दहामध्ये निवड झाली आहे. स्पर्धेत तुमचे व्यक्तिमत्त्व, शारीरिक बांधा यासह बौद्धिक चाचणी व ड्रेसिंगवरदेखील महत्त्वपूर्ण लक्ष केंद्रित करावे लागते, असेही दारासिंह म्हणाला.

Trending