Home »Maharashtra »Marathwada »Other Marathwada» Pardon , Damania 's Threat To Mla Dhas

माफी मागा, आमदार धस यांना अंजली दमानियांचा दम!

प्रतिनिधी | Feb 23, 2013, 08:50 AM IST

  • माफी मागा, आमदार धस यांना अंजली दमानियांचा दम!

बीड - राष्‍ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्ह्यातील आष्टीचे आमदार सुरेश धस यांनी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरून आम आदमी पार्टीच्या प्रदेश समन्वयक अंजली दमानिया शुक्रवारी चांगल्याच संतापल्या. स्वत:ला सुसंस्कृत समजणा-या आमदार धस यांनी एखाद्या स्त्रीबद्दल असे वक्तव्य करणे अत्यंत चुकीचे आणि त्यांना न शोभणारे आहे. 48 तासांच्या आत आमदार धस यांनी केलेले आरोप सिद्ध करून दाखवावेत, अन्यथा जाहीर माफी मागावी, असे आव्हानच दमानिया यांनी दिले आहे.

जिल्हाधिकारी सुनील केंद्रेकर यांच्या बदली प्रकरणावरून वादंग उठल्यानंतर आमदार धस यांनी गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन आपली बाजू मांडली होती. या वेळी त्यांनी दमानिया यांच्याविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यापाठोपाठ दमानिया यांनी शुक्रवारी पत्रकार परिषद घेतली. केंद्रेकर यांना बीड येथे रुजू करून घेण्यासाठी दमानिया बीड येथील नागरिकांच्या आंदोलनात उतरल्या आहेत. जिल्हाधिकारी केंद्रेकर यांची बदली रद्द करण्यासाठी जिल्ह्यातील जनतेने उभारलेल्या लढ्याला पाठबळ देण्यासाठी आम्ही आलो आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
दमानिया यांच्या या पत्रकार परिषदेला आम आदमी पार्टीच्या राष्‍ट्रीय संयोजन समितीचे सदस्य मयंक गांधी, बीड जिल्हा समन्वयक शिवाजी वाघ यांची उपस्थिती होती.
राष्‍ट्रवादीची गुंडगिरी
राज्यात राष्‍ट्र वादीची सत्ता असलेल्या सर्वच ठिकाणी जिल्हाधिकारी असुरक्षित आहेत. राजकीय दबाव आणत पक्षाच्या नेत्यांनी गुंडगिरी चालवली आहे. जालन्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांनीही राजकीय दबाव आणून शाळा-महाविद्यालयांसाठी जमिनी ताब्यात घेतल्या आहेत. गेल्या दहा वर्षांपासून शाळेसाठी जागा मागणा-यांना मात्र जमीन मिळत नाही.’’
अंजली दमानिया, प्रदेश समन्वयक, आम आदमी पार्टी
काय म्हणाले होते धस
भाजप नेते गोपीनाथ मुंडे यांच्याकडे अंजली दमानियांसारखे अनेक जण आहेत. मुंडे सांगतील तेच हे लोक बोलतात. मुंडे यांनी यापूर्वीही नितीन गडकरी यांच्या पूर्ती कारखान्यातील घोटाळाप्रकरणी दमानिया यांचा वापर करून घेतला आहे. हे आरोप करताना धस यांनी दमानिया यांच्यासाठी अश्लाघ्य असा शब्द वापरला होता.

Next Article

Recommended