आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डोंगरकुशीतील हिवरा गावाचा श्रमदानात उत्स्फूर्त सहभाग

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भूम - पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून ८ एप्रिल ते २२ मेदरम्यान संपूर्ण राज्यात राबवण्यात येत असलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेसाठी ८ एप्रिलपासून श्रमदानास सुरुवात झाली आहे. रविवारी (दि.१६) फाउंडेशनच्या वतीने तालुक्यात महाश्रमदान उपक्रम घेण्यात आला.
 
यामध्ये डोंगराच्या कुशीतील ८०० लोकसंख्येच्या हिवरा गावात श्रमदानास १०० टक्के प्रतिसाद मिळाला.  पाण्याचे योग्य नियोजन करून त्याचा योग्य वापर व्हावा, यासाठी पाणी अडवून जमिनीत जिरवण्यासाठी महाश्रमदानात हिवरा येथील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून श्रमदान केले. सकाळी ७ वाजता ग्रामस्थांनी कामास सुरुवात केली. ग्रामस्थांना ग्रामपंचायतीने पिण्यासाठी थंड पाण्याची व्यवस्था  केली होती.
बातम्या आणखी आहेत...