आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूरकरांची डोकेदुखी आता बंद होणार! सोलापूर,पुण्यातून मिळणार पासपोर्ट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - अनेक वर्षांपासून लातूरकरांना पासपोर्ट काढायचे म्हटले की ५०० किमीवर असलेल्या नागपूरला जावे लागायचे.  ही डोकेदुखी आता बंद होणार असून लातूरकरांना आता सोलापूर व पुणे येथून पासपोर्ट काढता येणार आहे.  यासाठी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी मागील तीन वर्षांपासून संसदेत पाठपुरावा सुरू ठेवला होता, त्यांच्या या प्रयत्नांना आता यश आले आहे. 
 
लातूर हे शैक्षणिक केंद्र आहे. या शहरासह जिल्ह्यातील हजारो डॉक्टर, अभियंते हे परदेशात शिक्षणासह व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर आहेत. त्याचप्रमाणे दरवर्षी हजारो तरुण शिक्षणासाठी परदेशात जातात. त्याचबरोबर लातूर हा अल्पसंख्याक बहुल जिल्हा असल्यामुळे दरवर्षी हजारो नागरिक या भागातून हजयात्रेला जातात. त्यासाठीचा पासपोर्ट काढण्यासाठी ५०० किलोमीटर  असलेल्या नागपूर येथे पासपोर्ट काढण्यासाठी जावे लागत होते.  या त्रासातून मुक्तता व्हावी, यासाठी खासदार डॉ. सुनील गायकवाड यांनी मागील तीन वर्षांपासून लातूरलाच पासपोर्ट कार्यालय सुरू करण्याची मागणी लावून धरली होती. 
 
 
यासाठी त्यांनी संसदेच्या अधिवेशनात वारंवार प्रश्न उपस्थित करून सभागृहाचे लक्ष वेधले होते. त्याचबरोबर त्यांनी परराष्ट्र व्यवहार मंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे अनेकवेळा निवेदने देऊन पाठपुरावा सुरू ठेवला होता. याची दखल घेत स्वराज यांनी लातूरला नागपूर पासपोर्ट कार्यालयातून तोडून पुणे येथील कार्यालयाशी जोडले आहे. त्याचबरोबर पुणे कार्यालयांतर्गत सोलापूर येथे नवीन पासपोर्ट कार्यालय सुरू केले आहे. 
 
बातम्या आणखी आहेत...