आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाथरीचे अपक्ष आमदार मोहन फड भाजपात दाखल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी- शिवसेना-अपक्ष- शिवसेना असा प्रवेश करत अवघ्या महिनाभरापूर्वीच शिवसेनेला जय महाराष्ट्र केलेले पाथरीचे अपक्ष आमदार मोहन फड यांनी गुरुवारी (दि.२७) पुणे येथे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. २०१४ मध्ये राज्यात भाजपला सत्ता स्थापनेसाठी सहकार्य करून सहयोगी सदस्य राहिलेले आ. फड यांनी आता अधिकृत भाजप प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलणार असल्याचे दिसून येते.  
 
पुणे येथे भाजपच्या सुरू असलेल्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत आ. फड यांच्यासह पाथरी विधानसभा मतदारसंघातील शिवसेनेच्या अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पक्षात त्यांचे स्वागत केले. फड हे दोन वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिलेले आ. फड यांनी २००९ च्या निवडणुकीत शिवसेनेकडे विधानसभेसाठी उमेदवारी मागितली होती; परंतु त्यांना डावल्याने त्यांनी इंद्राणी मित्रमंडळाच्या माध्यमातून पाथरी विधानसभा मतदारसंघात २०१४ च्या निवडणुकीपूर्वी दोन वर्षांपासूनच स्वबळावर  विकासकामे केली. मित्रमंडळाचा व्यापक विस्तार करत त्यांनी २०१४ च्या निवडणुकीत अपक्ष म्हणून रिंगणात उडी घेत दोन्ही काँग्रेससह शिवसेनेला पराभूत करत विजयश्री संपादन केली होती. निवडून येताच भाजपला सत्ता स्थापनेसाठी तातडीने पत्र देऊन ते भाजपचे सहयोगी सदस्य झाले होते. मागील दोन वर्षांच्या कार्यकाळात त्यांनी सत्तेच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर निधी आणून  रस्त्यांसह विविध विकासकामे सुरू केली होती. ते भाजपमध्ये अधिकृत प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू असतानाच सहा महिन्यांपूर्वी ते अनपेक्षितपणे शिवसेनेत दाखल झाले. नगरपालिका, पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत त्यांनी पाथरीत शिवसेनेला चांगले यश मिळवून दिले.  मानवत पंचायत समिती सभापति निवडणुकीत  समर्थकाला डावलले गेल्यावरून खा. संजय जाधव  ,पदाधिकाऱ्यांशी  संघर्ष उडाला.  
 
हे पण वाचा...
 
बातम्या आणखी आहेत...