आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पवारांना उद्धव ठाकरेंचा धसका

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी जालना येथे सभा घेऊन मराठवाड्यातील दुष्काळासंदर्भात आवाज उठवला. त्याचा धसका घेऊन आता केंद्रीय कृषिमंत्री व इतर मंत्री दुष्काळी भागाचा दौरा करीत आहेत. मीटिंगा घेऊन वेळ वाया घालवण्यापेक्षा या नेत्यांनी दुष्काळी भागाला अधिकाधिक निधी उपलब्ध करून द्यावा. मराठवाड्यातील दुष्काळाबाबत चार महिन्यांपूर्वीच राज्य सरकार व केंद्र सरकारला अहवाल सादर करण्यात आला. संसदेतही यावर चर्चा झाली. आता दौरे व मीटिंगा घेऊन पुन्हा-पुन्हा तीच चर्चा करण्यात काय अर्थ आहे? त्यापेक्षा कृषिमंत्र्यांनी केंद्राकडून जास्तीत जास्त निधी या भागाला मिळवून द्यावा, अशी मागणी खासदार वानखेडे यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना केली.

मराठवाड्यातील दुष्काळावर चर्चा करण्यासाठी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी सोमवारी औरंगाबाद येथे बैठक घेतली. या बैठकीला नांदेड जिल्ह्यातील खासदारद्वय अनुपस्थित राहिले. हैदराबाद येथे सोमवारी केंद्र सरकारतर्फे देण्यात आलेल्या निधीच्या विनियोगासंदर्भात चर्चा करण्यासाठी खासदारांची बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीला खासदार भास्करराव पाटील व खासदार सुभाष वानखेडे उपस्थित असल्याने त्यांना या बैठकीला जाता आले नाही. नांदेडचे खासदार भास्करराव पाटील खतगावकर म्हणाले की, संसदेचे अधिवेशन लवकरच सुरू होणार आहे. त्यामुळे संसदेच्या विविध पार्लमेंटरी कमिटीच्या बैठकी सध्या सुरू आहेत. या बैठकीसाठी मी सोमवारी हैदराबाद येथे आलो. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी खासदारांची अर्जंट बैठक
बोलावली. रविवारी मला या बैठकीचे निमंत्रण मिळाले. तोपर्यंत मी हैदराबादला आलो होतो. त्यामुळे जाणीवपूर्वक त्या बैठकीला गेलो नाही, असे नाही.

परंतु तत्पूर्वी माझ्या कार्यालयामार्फत मी शरद पवार यांच्याकडे निवेदन पाठवले आहे. नांदेड जिल्ह्यात विष्णुपुरी बंधा-या मुळे दुष्काळाची तीव्रता कमी आहे. त्यामुळे गोदावरी नदीवरील अंतेश्वर, बळेगाव या बंधा-यांना 50 कोटींचा निधी द्यावा. मनार नदीवरील कोटेकल्लूर व टाकळी, लेंडी नदीवरील हनुमान हिप्परगा व सांगवी या बंधा-यांनाही निधी द्यावा. या बंधा-यामुळे दुष्काळावर मात करता येईल, अशी मागणी खतगावकर यांनी केली आहे.

या विद्यापीठांचा असेल समावेश...
गरजू विद्यार्थ्यांची यादी संबंधित अकृषी व कृषी विद्यापीठाकडून व विद्यापीठ कार्यक्षेत्र महाविद्यालयातून मागवण्यात येईल. यामध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, पुणे विद्यापीठ, सोलापूर विद्यापीठ, शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर, उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आदींचा समावेश राहील.

असा राहील उपक्रम...
गरजू विद्यार्थ्यांची नावे विद्यापीठाने जाहीर केल्यानंतर मदत वाटपाचा कार्यक्रम तालुक्यातील एका महाविद्यालयात राष्ट्रवादी पदाधिका-यांच्या हस्ते केला जाईल.

निमंत्रण दिलेच नाही: मुंडे
मला कृषी मंत्रालय किंवा विभागीय आयुक्त कार्यालयाकडून निमंत्रण मिळाले नाही. निमंत्रण मिळाले असते तर नियोजित सर्व दौरे रद्द करून बैठकीस हजेरी लावली असती. खासदार म्हणून माझ्यावरील जबाबदारीचे कर्तव्य मी पार पाडत आहे. त्यांनीच मला बोलावले नाही. माझी बीड जिल्ह्यासह महाराष्‍ट्रासाठी नेहमीच आग्रही भूमिका आहे. दुष्काळ निवारणासाठी एका-एका मंत्र्याने बैठका घेऊन भागणार नाही. कॉँग्रेस व राष्‍ट्रवादीच्या मंत्र्यांनी सर्वांसोबत मंत्रालयात व्यापक बैठक घ्यावी. औरंगाबादच्या बैठकीत मीच एकटा नव्हतो, तर कॉँग्रेसचेही मंत्री गैरहजर होते त्याचे काय ? त्या अर्धा तासाच्या बैठकीत असे कोणते निर्णय होणार आहेत. दुष्काळी स्थितीमध्ये पाणी व रोजगाराचे प्रश्न गंभीर आहेत; परंतु ते प्रश्न सोडवण्यात शासन अपयशी ठरले, अशी प्रतिक्रिया खासदार गोपीनाथ मुंडे यांनी दिली.