आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ चौघांना रविवारपर्यंत मिळाली पोलिस कोठडी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई- दरोड्याच्या तयारीत असताना अपर पोलिस अधीक्षकांच्या पथकाने पाठलाग करून पकडलेल्या चार जणांना न्यायालयाने रविवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.   

अंबाजोगाईत सहा जण जीपमधून दरोड्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाल्यावरून अपर पोलिस अधीक्षकांच्या पथकाने पाठलाग करून त्यांना पकडले होते. यातील दोघे पळून जाण्यात यशस्वी झाल  तर प्रशांत सुरेश शेप (रा. शेपवाडी, ता. अंबाजोगाई), बिभीषण महादेव चाटे (रा. साकूड, ता. अंबाजोगाई), अशोक चंद्रसेन तोंडे (रा. सोनीमोहा, ता. धारूर) आणि महादेव तुकाराम गडदे (रा. चिचखंडी, ता. अंबाजोगाई) हे चार जण पोलिसांच्या हाती सापडले हाेते. त्यांच्याविरोधात शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला होता. 
बातम्या आणखी आहेत...