आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

तडजोडीद्वारे 230 प्रकरणांचा निपटारा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा वकील संघाच्या संयुक्त विद्यमाने शनिवारी आयोजित लोकअदालतीत 231 प्रकरणे निकाली निघाली. यातून मावेजा रक्कम 14 कोटी 7 लाख 10 हजार रुपये व दावा दाखलपूर्व प्रकरणात 37 हजार 300 अशी एकूण 14 कोटी 7 लाख 47 हजार 300 रुपये रक्कम वसूल झाली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश रा. वि. देशमुख होते. या वेळी जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष कैलास रत्नपारखे, सचिव ज्ञानेश्वर वाघ, सहसचिव ए. व्ही. वायाळ, सरकारी वकील मुकुंद कोल्हे, जिल्हा न्यायाधीश-1 के. के. गायकवाड, जिल्हा न्यायाधीश-2 ए. एन. करमरकर, जिल्हा न्यायाधीश निरंजन रा. नाईकवाडे, जिल्हा न्यायाधीश व्ही.एस. देशपांडे, मुख्य न्यायदंडाधिकारी आर. पी. परदेशी, सहदिवाणी न्यायाधीश एस. टी. कटारे, सहन्यायाधीश एस. बी. जोशी, सहन्यायाधीश आर. आर. तेहरा, व्ही. पी. फडणीस, सी. पी. शेळके, सुपेकर, भाटिया यांची प्रमुख उपस्थिती होती. पंच म्हणून गोविंदप्रसाद मुंदडा, अ‍ॅड. बी.एम. साळवे, जे. सी. बडवे, आर. बी. पडोळ, एस. ए. कुलकर्णी, दीपक नाईक, एस. एम.कुलकर्णी, रोषण गोलेच्छा, महेंद्र साळवे, अ‍ॅड. कल्पना त्रिभुवन, मनोरमा तिडके होत्या.

लोकअदालत यशस्वी करण्यासाठी लिपिक ए. डी. शेजवळ, कनिष्ठ लिपिक योजना दाभाडकर, बेलिफ बाबासाहेब कुलकर्णी, एम. व्ही. कुलकर्णी, एस. पी. गडदे यांनी श्रम घेतले.
धनगर पिंप्रीतील शेतकर्‍यांना मिळणार वाढीव मावेजा अंबड तालुक्यातील धनगर पिंप्री येथील पाझर तलावासाठी शासनाने शेतकर्‍यांच्या जमिनी संपादित केल्या होत्या. यात शेतकर्‍यांना वाढीव मावेजा न्यायालयाने मंजूर केला होता. सदरील रक्कम वसुलीसाठी शेतकर्‍यांनी अर्ज दाखल केले होते. राज्य शासनाने ही रक्कम न्यायालयात जमा केली होती. यानुसार शनिवारी लोकअदालतीमध्ये शेतकर्‍यांचे अर्ज निकाली काढले. यामुळे शेतकर्‍यांना आता मावेजाची रक्कम मिळणार आहे. नमूद रकमेचा धनादेश प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीशांच्या नावाने शासनाने न्यायालयात जमा केला होता.