आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चित्रसाधनाद्वारे अंबादास म्हेत्रेंची फोटोग्राफीची 60 वर्षांची ‘साधना’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- तीस वर्षापूर्वीचा काळ. त्यावेळी फोटो काढायचे म्हटल्यावर एकच नाव अग्रेसर होते, ते म्हणजे चित्रसाधना फोटो स्टुडीओ. नेहरू चौकात अंबुरेच्या बिल्डिंगमध्ये दुसऱ्या माळ्यावरील हे दुकान. चित्रसाधनाचे फोटोग्राफर अंबादास म्हेत्रे यांची चित्रसाधनातून सुरू झालेली फोटोग्राफीची ही साधना आज ६० वर्षानंतरही कायम आहे. 

तसे पाहता उस्मानाबादेत मोरवे बिल्डिंगमधील कोहिनूर फोटो स्टुडिओ हा नैमोद्दीन काझी यांचा पहिला व्यावसायिक फोटो स्टुडिओ होता. त्यांच्यानंतर जानेवारी १९७० रोजी अंबादास म्हेत्रे यांनी नेहरू चौक येथे जुन्या भाजी मंडईजवळ अंबुरेच्या वाड्यात चित्रसाधना फोटो स्टुडिओची मुहूर्तमेढ रोवली. तब्बल बेचाळीस वर्षे हा स्टुडिओ एकाच ठिकाणी होता. पुढे तो चार वर्षापूर्वी पोलिस मैदानासमोर साधना फोटो स्टुडिओ म्हणून आजही दारफळकर कॉम्प्लेक्समध्ये कार्यरत आहे. अंबादास म्हेत्रे हे वयाच्या अष्ट्याहत्तराव्या वर्षीही तेवढ्याच क्षमतेने फोटो क्लिक करतात. फरक एवढाच आहे की, तेव्हा त्यांच्या हातात १२० रुलीफ्लेक्सचा हाताने रील फिरविण्याचा कॅमेरा होता, आता डिजिटल कॅमेरा आहे. अंबादास म्हेत्रे यांच्याबरोबरच प्रेस फोटोग्राफर कालिदास म्हेत्रे नातू विनय अशा तीन पिढ्या सध्या या व्यवसायात कार्यरत आहेत. त्यांच्या त्यावेळेच्या आठवणी तसेच फोटोग्राफीसमोरील अडचणी सांगताना अंबादास म्हेत्रे यांनी बदलत्या व्यवसायाचेही गणित सांगितले. 

इयत्ता पाचवीत शाळा सोडल्यानंतर वयाच्या ११ व्या वर्षी सोलापुरात एका फोटो स्टुडिओत या कामाचे धडे गिरविण्यास प्रारंभ केला. तब्बल आठ वर्षे काम केल्यानंतर फोटो स्टुडिओ सुरू केला. तेव्हा, ते हजार रुपयांना कॅमेरा मिळत असे. परंतु, तेवढे पैसे नसल्याने अवघ्या सातशे रुपयांमध्ये जुना कॅमेरा घेऊन व्यवसाय सुरू केला. त्यावेळी ज्याला फोटो काढणे, धुने, टचिंग करणे, प्रिटिंग, फिनिशिंग अशी सर्व कामे जमत तोच खरा फोटोग्राफर होता. त्याकाळी आयडेंटी साईजची फोटो रुपयांमध्ये मिळत होते. सर्व फोटो ब्लॅक अॅन्ड व्हाइट मिळत. दुकान सुरू केल्यानंतर जवळपास पंधरा वर्षे हेच फोटो मिळत होते. 

राखी पौर्णिमेला दुकान फुल्ल 
पूर्वीघरोघरी जाऊन फोटाेग्राफीची सोय नव्हती. त्यामुळे फोटो काढायचे असल्यास स्टुडिओमध्येच जावे लागत होते. आज आपण राखीपौर्णिमेला घरातच राखी बांधताना, औक्षण करतानाचा कॅमेऱ्यात अथवा मोबाईलमध्ये फोटो काढतो. परंतु, तीस वर्षापूर्वी म्हेत्रे यांच्या दुकानात राखी बांधताना तसेच औक्षण करतानाचे फोटो काढण्यासाठी तब्बल चार ते पाच दिवस अक्षरक्ष: बहीण-भावांची गर्दी होत. दुकानातच औक्षणाचे ताट तसेच त्यामधील साहित्यही तयार ठेवलेले असायचे.
बातम्या आणखी आहेत...