आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सात उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

फुलंब्री - तालुक्यातील वडोदबाजार येथील 50 ते 60 नागरिकांनी अन्न सुरक्षा योजनेत नावे समाविष्ट करावीत, यासाठी तहसील कार्यालयासमोर शुक्रवारपासून (21 फेब्रुवारी) उपोषणास बसले आहेत. मागील चार दिवसांपासून उपोषण सुरूच आहे. मात्र, सोमवारी सात उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.

शासनाने नुकत्याच गरिबासाठी सुरू केलेल्या अन्न सुरक्षा योजना यादीत वडोदबाजार येथील शेकडो गरीब नागरिकांची नावे वगळण्यात आले आहे. त्यामुळे रिपाइं (डी) च्या वतीने उपोषण सुरू केले आहे.

चार दिवसांपासून सुरू असलेल्या या उपोषणाची दखल तहसीलदार आर. बी. लबडे व नायब तहसीलदार प्रवीण पांडे यांनी घेतली नाही. त्यामुळे जोपर्यंत ठोस आश्वासन मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहणार असल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. सोमवारी मिलिंद नवतुरे (50), पंडित ददरे (35), गंगाराम मखरे (40), मंगलबाई पवार (40), कमलबाई थोरात (65), जनाबाई जाधव (60), ताराचंद टिटे (55) या सात उपोषणकर्त्यांना चक्कर येणे, मळमळ असा त्रास सुरु झाला.