आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाब्बास रे वाघा, दुष्काळ-अडचणी-अपंगत्वावर केली मात, कसतोय 150 एकर शेती

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एका हाताने शेतात काम करताना महादेवअप्‍पा. - Divya Marathi
एका हाताने शेतात काम करताना महादेवअप्‍पा.
लातूर - ऐन उमेदीच्‍या काळात त्‍याचा एक हात खांद्यापासूनच कापावा लागला. अशातच वडिलांचा आधार गेला. घरात आई आणि पाच बहिणी. कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी त्‍याच्‍यावर येऊन ठेपली. पण, हा पठ्ठया खचला नाही. हताश होऊन आपल्‍या अंपगत्‍वाचे रडगाणे गात बसला नाही. मागील 45 वर्षांपासून एकाच हाताने शेतातील सर्व कामे करून तो कुटुंबाचा गाडा हाकत आहे. एवढेच नाही तर आपल्‍या 40 एकर वडिलपार्जित शेतजमिनीमध्‍ये राबून तब्‍बल 110 एकर शेतजमीन विकत घेतली आहे. शिवाय बहिणींचेही थाटात लग्‍न लावून दिले. महादेवअप्पा चिद्रे (रा. दवणहिप्परगा, ता. देवणी) असे या प्रेरणादायी व्‍यक्‍तीमत्‍त्‍वाचे नाव आहे.
दुष्‍काळात तेरावा महिना
- वर्ष 1972 मध्‍ये महादेवअप्पांचा एक हात खाद्यांपासून कापावा लागला.
- त्‍याच वर्षी त्‍यांच्‍या वडिलांचे निधन झाले.
- दरम्‍यान, लातूर जिल्‍ह्यातच नव्‍हे तर संबंध देशात त्‍याच वर्षी भीषण दुष्‍काळ पडला.
- घरामध्‍ये खायला दाणा नव्‍हता.
- ओघानेच चिद्रे कुटुंबावर दुख:चा डोंगर कोसळला
- परंतु, तेव्‍हापासून महादेअप्‍पांनी आपल्‍या एका हातावर कुटुंबाचे ओझे पेलले.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, बुटेल, ट्रॅक्‍टर आणि चारचाकीही... शेतालाच मानतात पंढरी....