आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिशोर येथील दारूचे दुकान दोन महिन्यांतच गावाबाहेर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिशोर- जादा दराने विक्री करत असल्याच्या कारणावरून उत्पादन शुल्क विभागाने १ मार्च रोजी येथील शासनमान्य देशी दारूच्या दुकानाला सील ठोकले होते. अखेर शनिवारी प्रशासनाने हे दुकान उघडताच येथे मोठा जमाव जमला होता. महिलांसह ग्रामस्थांनी दुकान उघडण्यास विरोध केला. हे दुकान गावाबाहेर काढावे अन्यथा दुकान उघडू देणार नाही अशी भूमिका संतप्त महिलांनी घेतली. अखेर पोलिसांच्या मध्यस्थीने तणाव निवळला.

रविवारी सकाळी पुन्हा दुकान उघडताच येथे मोठा जमाव जमला. महिलांनी दुकान गावाबाहेर हटवण्याची मागणी करत घोषणाबाजी केली. यावेळी पोलिसांनी पुन्हा मध्यस्थी केली. घोषणाबाजीनंतर दुकान गावाच्या बाहेर हलवा ही मागणी महिलांनी लावून धरली होती. परिस्थिती लक्षात पोलिसांनी मध्यस्थी करत महिलांना शांत केले. त्यानंतर पोलिसांनी दुकान मालक लक्ष्मीनारायण जैस्वाल व काही महिलांना ठाण्यात बोलावून घेतले होते. संतापलेल्या महिलांचा दुर्गावतार पाहून पंचांसमक्ष मी दोन महिन्यात दुकान गावाबाहेर हवलतो असे लिहून दिले. त्यानंतर दुपारी चार वाजता दुकान उघडले.