आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पितळखाेरा लेणीसाठी जपानची मदत, ढिसूळपणा शाेधून केली जात आहे डागडुजी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
एकाच रांगेतील चार लेण्या - Divya Marathi
एकाच रांगेतील चार लेण्या
कन्‍नड- पश्चिम भारतातील शैलस्थापत्याच्या अाद्य केंद्रापैकी एक असलेल्या पितळखाेरा लेणीचे वैभव कायम राहण्यासाठी पुरातत्व विभागाने अाराखडा तयार केला अाहे. त्या अनुशंगाने काही कामे पूर्ण करण्यात अाली असून दुसऱ्या टप्प्यात लेण्यांमधील प्राचीन कलाकृतींची डागडुजी करण्यात येईल. या कामासाठी जपान सरकारची मदत मिळतेय.
भूगर्भशास्त्रीय अभ्यासातून लेण्यांमधील ढिसूळपणा शाेधून त्या ठिकाणी डागडुजी केली जात असल्याचे पुरातत्व विभागाचे उपअधीक्षक शिवाकांत वाजपेयी यांनी सांगितले. स्थापत्य रचना कलात्मकतेच्या दृष्टीने नव्हे तर धार्मिक, सामाजिक अार्थिक अभ्यासाच्या दृष्टीने पितळखाेरा या प्राचीन स्थळाचे महत्त्व अाहे. येथे १४ बाैद्ध लेण्या असून ज्यांचा समावेश महाराष्ट्रातील अाद्य मठांमध्ये केला जाताे. त्यामुळे या स्थानास महत्त्व अाहे. लेण्यांची पडझड हाेत असल्याने पुरातत्व विभागाने जलजिअाॅलाॅजीकल सर्व्हे अाॅफ इंडिया या संस्थेकडून लेण्यांचा भूगर्भशास्त्रीय अभ्यास करून घेतला. संस्थेने ५५० पानांचा रिपाेर्ट मागच्या काळात पुरातत्व विभागाला दिला हाेता.
लेण्यांचे महत्त्व असे
लेण्यांचा अभ्यास केला तर येथे महायान कालखंडाचे अस्तित्व दिसून येते. चार लेण्यांचा मंडप विशाल असून त्यात सात कक्ष खाेदलेले अाहेत. त्याचे छत घुमटाकार अाहेत. येथे एका खांबावर शिलालेख असून त्यात हा स्तंभ गंधिक (अत्तर बनवणारे) कुळातील मितदेवाचे दान अाहे. दुसऱ्या खांबावर हे संधकाच्या पुत्राचे दान अाहे, असा उल्लेख अाहे.
पुढील स्‍लाइड्सवर पाहा संबंधित फोटो..
बातम्या आणखी आहेत...