आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

होमहवन करण्यापेक्षा झाडे लावा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मालेगावातील दिशा पब्लिक स्कूलच्या चिमुकल्यांनी सोमवारी दिंडी काढून जनजागर केले. - Divya Marathi
मालेगावातील दिशा पब्लिक स्कूलच्या चिमुकल्यांनी सोमवारी दिंडी काढून जनजागर केले.
नांदेड - प्रदीर्घ कालावधीपासून पावसाने दडी मारली. शेतकऱ्यांसमोर दुबार पेरणीचे संकट उभे राहिले. संकटाच्या काळात अनेक जण होम हवन, भंडारा, धोंडी धोंडी पाणी दे, देवाला पाण्यात बुडवून ठेवणे आदी प्रकार करत आहेत. मालेगावातील दिशा पब्लिक स्कूलच्या चिमुकल्यांनी सोमवारी जनजागरणाचा प्रयत्न केला.
मराठवाड्यात गेल्या तीन-चार वर्षांपासून ठाण मांडून बसलेल्या दुष्काळाच्या मुळाशी अवैध वृक्षतोड, प्रदूषण, पाण्याचा अपव्यय ही कारणे आहेत. कोणीही या कारणाच्या मुळाशी जाण्याचा प्रयत्न करत नाही. त्यामुळे दिशा स्कूलच्या चिमुकल्या १२५ मुलांनी मालेगावात वृक्ष दिंडी काढून झाडे लावा झाडे जगवा, पाणी अडवा पाणी जिरवा, या आशयाची पत्रके नागरिकांना वाटली.
दुष्काळ हटण्यासाठी प्रदूषण टाळणे, वृक्ष संवर्धन करणे काळाची गरज असल्याचा संदेश या दिंडीने नागरिकांना दिला. गावातील नागरिकांनीही या प्रयत्नाचे कौतुक केले. संस्थेचे अध्यक्ष प्रल्हाद इंगोले, प्राचार्य कल्पना कल्लाळ, उपाध्यक्ष एकनाथ पाटील, दीपाली कदम, माधव आवर्दे, तनुजा कल्याणकर, अमोल जोगदंड, साईनाथ इंगोले यांनी दिंडीच्या आयोजनासाठी पुढाकार घेतला.
बातम्या आणखी आहेत...