आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवोदित कवींनी कवितेतून मांडल्या समाजव्यथा; उपस्थित प्रेक्षक झाले मंत्रमुग्ध

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
टेंभूर्णी- महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या निमीत्ताने बुटखेडा येथील स्वामी विवेकानंद हायस्कूल आणि महाविद्यालयाच्या वतीने आजी-माजी विद्यार्थ्यांचे कवी संम्मेलन घेण्यात आले. यावेळी सर्व सहभागी कवी विद्यार्थ्यांनी विविध सामाजिक विषयांवरील कविता सादर करून उपस्थितांच्या काळजाला हात घात घातला.

नेहमीच विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात प्रसिध्द असलेल्या बुटखेडा येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयाच्या वतीने आजी-माजी विद्यार्थ्यांचे कवी संम्मेलन घेण्यात आले. ग्रामीण भागातील नवोदित कवींना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करूण देणे हा या कार्यक्रमामागचा उद्देश होता. या कार्याक्रमास जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती रामधन कळंबे, माजी जिल्हापरिषद सदस्य दत्तू पंडीत, जिल्हापरिषद सदस्य गिताताई बोरूडे, पंचायत समिती सदस्य दादाराव सवडे आणि सरपंच मीनाताई बदर यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी माजी विद्यार्थी संजय बनकर, सिध्दार्थ आदमाने, रविंद्र बनकर, नारायन बनकर, नितेश जाधव आणि अमोल जगताप या माजी विद्यार्थ्यांनी प्रेम, सैराट, घरातील वाटणी पद्धत, शेतकऱ्यांच्या समस्या, विकलांग अशा विविध सामाजिक विषयावरील कविता सादर केल्या. या नवोदित कवींची प्रतिभा पाहून उपस्थित गावकरी भारावून गेले होते. महाविद्यालयाचे प्राचार्य बुरकूल संर यांनी स्त्रीभ्रूण हत्या या विषयावरील 'व्हावी फुले कळ्यांची' ही कविता सादर केली. यावेळी सर्व प्रेक्षक मंत्रमुग्ध झाले होते. हा कार्यक्रम रात्री 12 वाजेपर्यंत सुरू होता, तोपर्यंत एकही प्रेक्षक जागेवरून उठला नाही. एवढा हा कार्यक्रम रंगला होता. 
 
महाविद्यालयाचे उपक्रम कौतूकास्पद : रामधन कळंबे
सामाजिक उपक्रम राबवण्यात स्वामी विवेकानंद हायस्कूल आणि महाविद्याल हे तालूक्यातील एकमेव महाविद्यालय आहे. कोणत्याही राजकीय व्यक्ती छायाछत्र नसलेले हे माहाविद्यालयाकडून एवढ्या मोठ्या प्रमाणात उपक्रम राबवण्यात येतात ही कौतूकास्पद बाब आहे. असे मत यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती रामधन कळंबे यांनी व्यक्त केले.
 
कार्यक्रमातील फोटो पाहण्यासाठी पुढील स्लाइडवर क्लिक करा...
बातम्या आणखी आहेत...