आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औषध समजून विष पिल्याने महिलेचा मृत्यू

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली - कळमनुरी तालुक्यातील सोडेगाव येथे पोट दुखत असल्याने औषध समजून विष पिल्याने एका महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना आज पहाटे पाचच्या सुमारास घडली. सयाबाई गोविंदा काचोळकर (50, रा. सोडेगाव, ता. कळमनुरी) असे मृत महिलेचे नाव आहे.
सयाबाई काचोळकर यांचे 6 ऑगस्ट रोजी सायंकाळच्या सुमारास पोट दुखत होते. घरी एकट्याच असताना त्यांनी पोटदुखीचे औषध समजून घरात ठेवलेले कीटकनाशक प्राशन केले. त्यामुळे पोटात जास्त वेदना सुरू झाल्याने त्यांना कळमनुरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार सुरू असताना मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गोविंदा यल्लाप्पा काचोळकर यांनी दिलेल्या माहितीवरून कळमनुरी पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.