आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Arrested Five Accused In Nanded Couple Assault Case

VIDEO: प्रेमींना मारहाण करणाऱ्यांना अटक, नांदेडमध्ये बलात्काराचाही केला होता प्रयत्न

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- अर्धापूर येथील शेतात गप्पा मारीत असलेल्या एका प्रेमीयुगुलाला मारहाण केल्याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांना आज (मंगळवार) अटक केली. या प्रकरणातील सात आरोपी अद्याप फरारी असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. आरोपींनी मुलीवर बलात्कार करण्याचाही प्रयत्न केला होता, असे पोलिस तक्रारीत सांगण्यात आले आहे.
12 जूनला दुपारी एकच्या सुमारास प्रेमीयुगुल शेतात गप्पा मारीत बसले होते. यावेळी ते कोणत्याही प्रकारचे अश्लिल प्रकार करीत नव्हते, असे सांगण्यात येत आहे. पण शेतात आलेल्या 12 तरुणांनी या दोघांना पकडले. त्यांना बेदम मारहाण करण्यास सुरवात केली. मुलीचा विनयभंग करीत बलात्कार करण्याचा प्रयत्न केला. यावेळी तरुणाने त्याच्या मित्रांना फोन केला. त्याचे दोन-तीन मित्र घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी अखेर दोघांना या आरोपींच्या ताब्यातून सोडविले.
त्यानंतर हे प्रकरण मिटले होते. प्रेमीयुगुलानेही बदनामीच्या भीतीने ही घटना कुणाला सांगितली नव्हती. पण आरोपींनी घडलेला प्रकार कॅमेऱ्यात टिपला होता. त्याचा व्हिडिओ व्हॉट्स अॅपच्या माध्यमातून पसरविण्यात येत होता. याची माहिती मिळाल्यावर प्रेमीयुगुलातील तरुणाने काल रात्रीच्या सुमारास पोलिस तक्रार दाखल केली. मुलगी अल्पवयीन असल्याने त्या संदर्भातही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यावर कारवाई करीत पोलिसांनी पाच जणांना अटक केली आहे.
पुढील स्लाईडवर बघा, या घटनेचा व्हॉट्स अॅपवर शेअर करण्यात आलेला व्हिडिओ...