आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पेट्रोल पंप लुटणारे दरोडेखोर पोलिसांच्या जाळ्यात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - तलवारीच्या धाकावर पेट्रोल पंप लुटणाऱ्या दरोडेखोरांच्या मुसक्या आवळण्यात येथील स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांना यश आले आहे. ११ जुलै रोजी रात्री येथून जवळच असलेल्या साखरा शिवारातील हिरेमठ पेट्रोल पंपावर युवकांनी दरोडा घातला होता. धारदार शस्त्रे, लाकडी दांडके व गावठी पिस्तूल घेऊन त्यांनी पेट्रोल पंपावरील रूममध्ये घुसून तेथील कर्मचाऱ्यांना मारहाण केली होती. गल्ल्यातील सुमारे ७० हजार रुपये लुटले होते. सोमवारी बावकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी उस्मानाबाद जिल्ह्यातील ताडगाव येथून या प्रकरणातील प्रमुख आरोपी अक्षय बाबासाहेब जाधवर (२३) व दत्ता सुग्रीव जाधवर (२५) यांना ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली व यात शिराढोण येथील काही जणांचा समावेश असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. त्यावरून सोमवारी शिराढोण पोलिसांच्या मदतीने लातूर पोलिसांनी शिराढोण येथून अशोक प्रभू काळे, अरुण बारीक काळे, पिंटू माणिक काळे (सर्व रा. शिराढोण पारधीपिढी) व बबन सायबा पवार (कुथाळा) हे पोलिसांच्या हाती लागले.
बातम्या आणखी आहेत...