आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालना: मोदीखान्यातील कुंटणखान्यावर धाड; 7 महिला, 3 पुरुष ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना- वेश्याव्यवसाय सुरू असल्याच्या मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी धाड टाकून सात महिला व तीन जणांना ताब्यात घेतल्याची घटना बुधवारी मोदीखाना भागात घडली. मोदीखाना भागात वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती मिळाल्यावरून उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. बनावट ग्राहक पाठवून घराच्या दुसऱ्या मजल्यावर हा व्यवसाय सुरू असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. यानंतर पोलिस, पोलिस महिला कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी धाड टाकून सात महिला व तीन जणांना ताब्यात घेतले. 

 

त्यांच्या ताब्यातून ३७ हजार ७१० रुपयांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई सचिन बारी, नालंदा लांडगे, कल्याण आटोळे, अनिल काळे, जाधव, सुलाने, साळुंके यांनी केली. याप्रकरणी दामिनी पथकाच्या सहायक पोलिस निरीक्षक नालंदा लांडगे यांच्या फिर्यादीवरून बाजार पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बातम्या आणखी आहेत...