आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Police Arrests Dr. Shrihari Sanap In Connection With Female Infanticide

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कळ्यांचे कर्दनकाळ पेशंट पाठवणारे डॉ. लहाने जेरबंद

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - स्त्री भ्रूणहत्या प्रकरणी डॉ. शिवाजी सानप यांचे सासरे स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. श्रीहरी लहाने यांना बुधवारी पोलिसांनी अटक केली. सानप हॉस्पिटलमध्ये महिला पेशंट पाठवणे, स्त्री भ्रूणहत्या, गर्भपाताला प्रोत्साहन देणे असे आरोप ठेवत डॉ. लहाने यांना या प्रकरणात सहआरोपी करण्यात आले आहे. दरम्यान, अटकेतील डॉ. शिवाजी सानप व दोन महिलांच्या पोलिस कोठडीत न्यायालयाने 11 जूनपर्यंत वाढ केली आहे.
बिंदुसरा नदीपात्रात गेल्या आठवड्यात स्त्री जातीची 2 अर्भके आढळून आली होती. या प्रकरणी आरोग्य व पोलिस यंत्रणेने डॉ. सानप यांच्या हॉस्पिटलची तपासणी केली. या वेळी मनीषा जावळे, मंगल घिगे यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांनी भ्रूणहत्येची कबुली दिली. त्यानंतर डॉ. सानप यांना अटक झाली. मुख्य न्यायदंडाधिकरी एस. एस. साळवे यांनी बुधवारी या सर्वांना 11 जूनपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. डॉ. लहाने यांना सहआरोपी करण्याचा अहवाल जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गौरी राठोड यांनी दिला होता. प्रकरणातील फरार महिला लता जोगदंड हिलादेखील अटक करण्यात आली.

सिव्हिल सर्जन गौरी राठोड यांना धमकी
सानप हॉस्पिटलमधील भ्रूणाची विल्हेवाट लावण्यात डॉ. लहाने यांच्या सहभागाचा संशय व्यक्त केल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गौरी राठोड यांना धमक्या आल्या. डॉ. लहानेंपासून जिवाला धोका असल्याची तक्रार त्यांनी पोलिसप्रमुख दत्तात्रय मंडलिक यांच्याकडे दिली. डॉ. लहानेंकडील रिव्हॉल्व्हर जप्त करण्याची मागणी त्यांनी केली. नंतर पोलिसांनी लहाने यांना ताब्यात घेतले. तहसीलदार प्रभोदय मुळे यांच्यासमोर हजर केल्यानंतर त्यांना जामीन मिळाला. त्यानंतर भ्रूणहत्या प्रकरणात लहाने यांना अटक करण्यात आली. त्यांना गुरुवारी कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

औषध विक्रेत्यांवर कारवाई होणार
मुंबई । स्त्री भ्रूणहत्या प्रकरणात बीड जिल्ह्यातील 15 औषधी दुकानांवर कारवाई करण्यात आली असून, राज्यातील मुलींचे प्रमाण कमी असलेल्या जिल्ह्यांतही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती अन्Þन व औषधी प्रशासन राज्यमंत्री सतेज पाटील यांनी बुधवारी दिली. बीडच्या 3 दुकानांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून, इतर दुकानांना नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान, गर्भनिरोधक आयपील गोळ्यांच्या दूरदर्शनवरून दाखवण्यात येणा-या अतिरंजित जाहिरातींवर बंदी घालण्याचा सरकारचा विचार आहे, असे पाटील म्हणाले.
डॉ. मुंडे दांपत्याचा जामीन अर्ज फेटाळला
सुदाम मुंडे हाजिर होः 3 जुलैपर्यंत अल्टिमेटम