आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आमदार बच्चू कडूंसह ४६ जणांवर गुन्हा, शासकीय कामकाजात अडथळ्याची तक्रार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद - जिल्हा परिषदेवर काढण्यात आलेल्या अपंग बांधवांच्या मोर्चानंतर आमदार ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा सोमवारी पोलिसांसोबत वाद झाला होता. या वादाला चोवीस तास उलटल्यानंतर पोलिसांनी शासकीय कामकाजात अडथळा आणून धमकी दिल्याची फिर्याद मंगळवारी दुपारी दिली आहे. या फिर्यादीवरून आमदार कडूंसह प्रहार अपंग क्रांती आंदोलनच्या ४६ कार्यकर्त्यांवर शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
अपंग बांधवांच्या कल्याणासाठी जिल्हा परिषदेने ३ टक्के निधी खर्च करावा, अपंगांना घरकुले वाटप करावीत आदी मागण्यांसाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलनचे अध्यक्ष तथा अचलपूरचे आमदार ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली सोमवारी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढण्यात आला. यानंतर पोलिस अधिकारी आणि आमदार कडू यांच्यामध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. पोलिसांनी त्यावेळी माघार घेतली. त्यामुळे आंदोलनात राडा झाला नाही. मात्र, तब्बल चोवीस तास उलटून गेल्यानंतर पोलिसांनी बच्चू कडू यांच्यासह प्रहार अपंग संघटनेचे जिल्हाध्यक्ष मयुर काकडे, बलराज रणदिवे, बाळासाहेब कांबळे, चंद्रकांत जाधव आणि अन्य ४० कार्यकर्त्यांवर मंगळवारी दुपारी शासकीय कामकाजात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबतची तक्रार शहर पोलिस ठाण्याचे कॉन्स्टेबल सतीश घंटे यांनी दिली आहे.
बातम्या आणखी आहेत...