आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

परभणीत तणाव; पोलिस हवालदाराकडून दुसर्‍या हवालदाराची भोसकून हत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परभणी- शहरातील हनुमान चौकात एका पोलिस हवालदाराने दुसर्‍या हवालदाराची तलवारीने भोसकून निर्घृण हत्या केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. ही घटना गुरुवारी घडली असून परिसरात भी्तीचे वातावरण निर्माण झाले आहे. खंडेराव सोडगीर असे मृत हवालदाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस हवालदार खंडेराव सोडगीर हे ड्यु‍टीवर होते. फारुख सैय्यद याने अचानक खंडेराव सोडगीर याच्यावर हल्ला चढविला. सोडगीर यांच्या पोटात तलवार भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे शहरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपी फारुख सैयद यास अटक करण्यात आली आहे.