आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिला पोलिसाचा आत्महत्येचा प्रयत्न, हिंगोली येथील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - सेनगाव पोलिस ठाण्यातील महिला पोलिस कर्मचाऱ्याने बुधवारी सकाळी १०.३० च्या सुमारास पोलिस ठाण्यातीलच पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली. पोलिस ठाणेदाराने मात्र कर्मचाऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला नसल्याचे सांगून मानसिक तणावामुळे ती पोलिस ठाण्यातून निघून गेली असल्याचे सांगितले.

महिला पोलिस कर्मचाऱ्याचे नाव वर्षा इंगोले (२८) असे आहे. सकाळी १०.३० च्या सुमारास वर्षा इंगोले या महिला कर्मचाऱ्याने वायरलेस विभागातील पंख्याला दोरी बांधून फाशी घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. परंतु ही बाब सहकारी कर्मचाऱ्यांना कळताच त्यांनी महिला कर्मचाऱ्याला बळाचा वापर करून खोलीबाहेर नेले. त्यानंतर या महिला कर्मचाऱ्याने पोलिस ठाण्यातून पळ काढल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनाला धडक बसली आणि ती किरकोळ जखमी झाली. त्यानंतर सेनगावचे पोलिस निरीक्षक श्रीधर फुलझळके यांनी महिला कर्मचाऱ्याची समजूत घालून तिला नर्सी नामदेव येथे तिच्या पालकांकडे नेऊन सोडले. पीआय फुलझळके यांनी मात्र आत्महत्या करण्याचा प्रयत्न झाल्याच्या वृत्ताचे खंडन केले असून प्रकरण किरकोळ असून काही कर्मचारी आपली बदनामी करण्यासाठी अशा अफवा पसरवत असल्याची पुस्तीही जोडली, तर पीडित महिला कर्मचाऱ्याशी मोबाइलवरून संपर्क साधला असता तिने प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.
माझ्या बदनामीचा डाव
- आज सकाळी वायरलेस विभागातील वर्षा इंगोले नावाच्या महिला पोलिस कर्मचाऱ्याने वायरलेस विभागातून इतरत्र बदली करण्याच्या मागणीसाठी वाद घातला. मानसिक तणावातून ती पोलिस ठाण्यातून निघून गेली आणि थोडाफार अनपेक्षित प्रकार घडला. प्रकार लहान असला तरी आमच्या विभागातील काही कर्मचारी माझी बदनामी व्हावी यासाठी अशा अफवा पसरवत आहेत. आपण सहानुभूती दाखवून महिला कर्मचाऱ्याला तिच्या पालकांकडे आराम करण्यासाठी स्वतः नर्सी नामदेव येथे सोडले.
श्रीधर फुलझळके, पीआय, सेनगाव.