आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

चांगला अधिकारी व्हायचे होते, पण मला उद्ध्वस्त केले म्‍हणत पोलिसाची आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याकडून झालेला त्रास व अन्य बदनामीमुळे अंबाजोगाई शहर ठाण्याचे पोनक घटना अंबाजोगाईतील जाेगाईवाडी परिसरात बुधवारी सकाळी दहा वाजता उडघकीस आली. दरम्यान, स्वाराती रुग्णालयातून त्यांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नातेवाइकांनी नकार दिल्याने तणावाचे वातावरण होते.

मोंढा भागात शनिवारी रात्री पोलिस नाईक संतोष चाटे सहकाऱ्यांसह गस्तीवर असताना रात्री साडेबारा वाजता प्रशांतनगरातील शिवानंद मेडिकलचे चालक योगेश शिवानंद गुजर फिरताना त्यांना दिसून आले. तू कोठे चालला, अशी विचारणा चाटे यांनी त्यांना केल्याने वाद झाला. गुजर यांनी मारहाण करून अंगावरील वर्दी फाडल्याची तक्रार चाटे यांनी पोलिस निरीक्षक श्रीराम पौळ यांच्याकडे केली होती. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणून मारहाण केल्याप्रकरणी गुजर यांच्यावर शहर ठाण्यात रविवारी गुन्हा दाखल होता.

दरम्यान, गुजर याने वर्दी फाडली नसतानाही त्याच्यावर गुन्हा नोंदवण्यात आल्याची चर्चा अंबाजोगाईत पसरली हाेती. अंबाजोगाई येथील औषध विक्रेता संघटनेने सोमवारी मेडिकल चालक गुजर यांच्यावर दाखल गुन्हा खोटा असून तो मागे घेण्याची मागणी पोलिस उपअधीक्षक नीलेश मोरे यांच्याकडे केली. या घटनेनंतर पाेलिस नाईक चाटे तणावाखाली होते. दरम्यान, शहराजवळील जोगाईवाडी तलावाजवळ कीटकनाशक प्राशन केलेल्या गंभीर अवस्थेत ते आढळून आले.
स्वाराती रुग्णालयात सायंकाळपर्यंत तणाव
पोलिस नाईक चाटे यांच्या आत्महत्येची माहिती मिळताच परळी तालुक्यातील दादाहरी वडगाव येथील त्यांच्या नातेवाइकांनी अंबाजोगाईत स्वाराती रुग्णालयात धाव घेतली. संताप व्यक्त केल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले. चाटे यांच्या आत्महत्या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी, या मागणीसाठी नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला होता.
पुढील स्‍लाइड्सवर वाचा, चांगला अधिकारी व्हायचे होते, पण मला उद्ध्वस्त केले....
व्यवस्थेने घेतलेला बळी....
बातम्या आणखी आहेत...