आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तान्हुल्याला पाहताच फोडला हंबरडा, बेपत्ता माता सापडली, पोलिसांना उलगडा होईना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - तीन दिवसांपासून मुलासह बेपत्ता झालेली २७ वर्षीय विवाहित महिला नातेवाइकांना खुलताबाद-फुलंब्री रस्त्यावर असलेल्या हॉटेलमध्ये बसलेल्या अवस्थेत सोमवारी आढळून आली. त्यामुळे नातेवाइकांची धावपळ थांबली आहे. छोट्या चिमुरड्याचे आई दिसताच रडणे थांबले, तर बाळाला पाहून तिनेही हंबरडा फोडला. या प्रकरणी पोलिस यासंदर्भात अधिक तपास करत आहेत.

फुलंब्री तालुक्यात येत असलेल्या वानेगाव येथील सरलाबाई अंकुश सोटम (२७) या ९ जानेवारी रोजी घरातील मंडळींना काही न सांगता सहा महिन्यांच्या बाळासह सकाळी घराबाहेर पडल्या होत्या. दिवस उलटला तरी सरलाबाई घरी आल्या नाहीत. त्यामुळे पतीसह नातेवाईक गाव परिसरात सरलाबाईंचा शोध घेत होते. याचदरम्यान खुलताबाद उरूस परिसरात असलेल्या मुंडी टेकडीच्या कडेला ६ महिन्यांचे बाळ एका १० वर्षांच्या मुलाला आढळून आले. यासंदर्भात पोलिसांना माहिती दिली असता त्यांनी ताब्यात घेतले. एकीकडे बाळ कोणाचे आहे, ते कोणी आणून सोडले याविषयी पोलिस तपास करत होते. यासंदर्भात दैनिकात वृत्त प्रकाशित होताच बाळाच्या वडिलांनी खुलताबाद पोलिस ठाणे गाठून बाळ ताब्यात घेतले. पण त्यावेळी बाळासह घरातून बेपत्ता झालेली त्या बाळाची आई सापडली नव्हती.
जबाबाकडे लक्ष
सासरच्या व माहेरच्या मंडळींनी सांगितले की, सरलाबाईचा स्वभाव चांगला आहे. तिचा घरात कोणाशीही वाद झाला नव्हता. पण पोलिसांसमोर वेगळाच पेच निर्माण झाला आहे. तो म्हणजे मग, बाळाला सोडून महिला नेमकी कुठे गायब झाली, का महिलेला कुणी बेपत्ता करण्याच्या हिशेबाने तर गायब केले नव्हते, असे एक ना अनेक प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे आता पोलिस कशा पद्धतीने या प्रकरणाचा उलगडा करतात, याकडे या भागातील सर्वांचे लक्ष लागून आहे.