आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गुरे तस्करांच्या वाहनावर पोलिसांचा गोळीबार, लातुरात थरार, पोलिस व्हॅनवर टेम्पो भिडवला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - गुरांची तस्करी करणाऱ्या टेम्पोचा पाठलाग करणाऱ्या पोलिस गाडीवर तस्करांनी टेम्पो घालून त्यातील पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना जिवे मारण्याचा प्रयत्न केला. ही घटना गुरुवारी पहाटे लातूर शहरात घडली. हा प्रकार घडताच गाडीतील सहायक पोलिस निरीक्षकांनी गाडीच्या दिशेने पाच राउंड फायर केले. तथापि, चोरटे फरार झाले. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तीन आरोपींविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

वाहतूक शाखेचे सहायक पोलिस निरीक्षक खुने हे बुधवारी रात्री त्यांच्या तीन कर्मचाऱ्यांसह एक ते दीडच्या सुमारास पेट्रोलिंगवर होते. लातूरहून ते औसा येथे गेले असता औसा टी पाॅइंटवर त्यांना लातूरहून टेम्पोतून गायी नेल्या जात होत्या. या टेम्पोने पोलिस व्हॅनला धडक देऊन तो पुढे जात असल्याचा संदेश वायरलेसवरून मिळाला. त्यामुळे त्यांनी गाडी लातूरच्या दिशेने वळवली. दरम्यान, दुसऱ्या संदेशात त्यांना तो टेम्पो नाईक चौकाकडे जात असल्याचा संदेश मिळाला. त्यामुळे त्यांनी सूतमिलमार्गे गाडी वळवली. गाडी कन्हेरी चौकाजवळ आली असता रिंगरोडवरून येणाऱ्या भरधाव टेम्पो सरळ पोलिस गाडीवर (एमएच २४ डी ७६८७) भिडवला. यात गाडीचा पुढचा भाग चेंदला गेला. िशवाय गाडीचालक अशोक माळवदे यांच्या डोक्याला दुखापत झाली. हा प्रकार पाहून खुने यांनी गाडीतून उडी मारली व त्यांच्या रिव्हाॅल्व्हरमधून पाच फैरी झाडल्या. त्यानंतर टेम्पोचालकाने टेम्पो वळवून पुन्हा एकदा पोलिस व्हॅनला धडक दिली. टेम्पोच्या साहाय्याने पोलिस गाडीला त्याने फरपटत रस्त्याकडेला नेले व टेम्पो भरधाव वेगात दामटल्याचे खुने यांनी सांगितले. दुसऱ्या धडकेत पोलिस गाडी बंद पडल्याने पोलिस टेम्पोचा पाठलाग करू शकले नाहीत. यात पोलिसांच्या गाडीचे सुमारे ८५ हजारांचे नुकसान झाल्याचे खुने म्हणाले.

शेतकऱ्यांत घबराट
रस्त्यावरची मोकाट गुरे चोरून त्यांची तस्करी करण्याचे प्रकार शहर व जिल्ह्यात वाढले आहेत. यापूर्वी दोन वेळा गाढवाची तस्करी करणारे टेम्पो पकडण्यात आले होते. अशा प्रकारांमुळे शेतकरी व पशुपालकांत घबराट निर्माण झाली अाहे.
बातम्या आणखी आहेत...