आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

सुदाम मुंडे हाजिर होः 3 जुलैपर्यंत अल्टिमेटम

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

परळी - स्त्री भ्रूणहत्याप्रकरणी फरार असलेले डॉ. सुदाम मुंडे व डॉ. सरस्वती मुंडे यांना परळी न्यायालयाने 3 जुलैपर्यंत हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा सीआरपीसी कायदा 83 नुसार संपत्ती जप्तीची कारवाई होऊ शकते.
डॉ. मुंडे यांच्या रुग्णालयात 18 मे रोजी विजयमाला महादेव पटेकर या महिलेच्या मृत्यूनंतर शहर पोलिसांत डॉ. मुंडे दांपत्यांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. दुस-या दिवशी त्यांना जामीन मिळाला. परंतु सामाजिक संघटनांनी आंदोलने केल्याने शासन आणि प्रशासनाने गंभीर दखल घेतली. डॉ. मुंडे दांपत्याने मिळालेला जामीन रद्द करावा यासाठी पोलिसांकडून न्यायालयात अर्ज सादर करण्यात आला. 22 मेपासून दांपत्य फरार आहेत. महाराष्ट्रासह विविध राज्यांत पोलिसांच्या पाच पथकांनी शोध घेऊनही ते सापडले नाही. दरम्यान, पोलिस उपअधीक्षक स्वाती भोर यांनी परळी न्यायालयात अर्ज सादर करून उद्घोषणा जारी करण्यासाठी आदेश पारित करण्याची विनंती केली होती. त्यास न्यायालयाने संमती दिली.

डॉ. जवाहर भंडारी यांच्यावर गुन्हा
राहुरी । गर्भलिंगनिदान करताना रंगेहाथ पकडण्यात आलेले डॉ. जवाहर भंडारी यांच्याविरुद्ध मंगळवारी गुन्हा दाखल करण्यात आला. स्टिंग आॅपरेशन करण्यापूर्वी तक्रारदार महिलेने गर्भलिंगनिदान करण्यासाठी डॉ. भंडारी यांना देण्यात येणा-या 27 हजार रुपयांच्या नोटांचे नंबर प्रतिज्ञापत्रावर लिहून नोटरी करून घेतले होते. स्टिंगनंतर पथकाने डॉ. भंडारी यांना दिलेली 27 हजारांची रक्कम त्यांच्याकडून हस्तगत केली.