आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गाय तस्करांच्या गोळीबारात पोलिस गंभीररीत्या जखमी; अहमदनगरमधील चापडगाव येथील घटना

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कर्जत- पिकअपमधून गायींची तस्करी करणाऱ्यांना पकडण्यासाठी पोलिसांनी त्यांचा सिनेस्टाइल पाठलाग केला. तस्करांनी चालत्या गाडीतून गोळीबार केल्याने एक पोलिस गंभीर जखमी झाला. ही घटना मंगळवारी पहाटे तालुक्यातील चापडगाव येथे घडली. 
मंगळवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास पोलिस गस्त घालत होते. नगर-सोलापूर रस्त्यावरील एका पिकअप वाहनाबद्दल संशय आल्याने पोलिस नाईक बबन पवार यांनी त्याला थांबण्याचा इशारा केला. मात्र, पिकअप भरधाव वेगाने सोलापूरच्या दिशेने निघाले. पोलिसांनी त्या पिकअपचा पाठलाग केला. 

पिकअपमध्ये ३ गायी पोलिसांना दिसल्या. पिकअप चापडगाव येथील पेट्रोल पंपाजवळील खड्ड्यात आदळल्याने पोलिस ओव्हरटेक करून पुढे गेले. पिकअप चालकाने गाडी पुन्हा विरुद्ध दिशेने वळवली. चापडगाव बसथांब्याजवळ पोलिस चालक पवार यांच्या दिशेने गोळीबार केला. पवार यांच्या उजव्या खांद्याला गोळी लागली. त्यामुळे पवार यांचा वाहनावरील ताबा सुटून रस्त्याच्या कडेला भिंतीवर गाडी आदळली. बरोबर असलेले सहायक फौजदार आर. एस.  मकासरे व एस. डी. लोखंडे हे जखमी झाले.