आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जालन्यात छावाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांचा लाठीमार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - मराठा समाजास आरक्षणाची मागणी करत जिल्हाधिकारी कार्यालयास टाळे ठोकण्याचा प्रयत्न करणा-या अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी सोमवारी लाठीमार केला. यात एक कार्यकर्ता जखमी झाला. पोलिसांनी 14 जणांना अटक केली.
अखिल भारतीय छावा मराठा युवा संघटनेच्या आरक्षणासाठी केलेल्या आंदोलनांची जिल्हा प्रशासनाने दखल घेतली नाही. याचा निषेध करण्यासाठी तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्याची मागणी करीत संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयास कुलूप ठोकण्याचा प्रयत्न केला. दुपारी 12 च्या सुमारास जिल्हाप्रमुख देवकर्ण वाघ, जिल्हा संपर्कप्रमुख विठ्ठल माने, विद्यार्थी आघाडीचे संदीप ताडगे यांच्यासह काही कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पोहोचले. प्रवेशद्वारातून आत जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अडवले. त्याचवेळी काही कार्यकर्त्यांनी भिंतीवरून आत जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी कार्यकर्त्यांवर लाठीमार सुरू केल्याने परिसरात गोंधळ उडाला. काही कार्यकर्ते स्वत: पोलिस व्हॅनमध्ये बसत असताना तीन-ते चार पोलिसांनी मिळून त्या कार्यकर्त्यांना बेदम मारहाण केली. पोलिस निरीक्षक रवींद्र पेरगुलवार, गजानन जायभाये यांचा ताफा या वेळी घटनास्थळी होता. यात विश्वनाथ पाटील (22, रोहिलागड, ता.अंबड) जखमी झाला. त्याला जिल्हा रुगणालयात दाखल करण्यात आले आहे.