आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अटक न करण्यासाठी घेतली 10 हजारांची लाच, पोलिस हवालदार एसीबीच्या जाळ्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- गुन्ह्यातील आरोपीला अटक न करण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच हवालदाराने मागितली. तडजोडीअंती १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना लाचलुचपत पोलिसांच्या जाळ्यात तो अडकला. अंबड पोलिस ठाण्याच्या अंतर्गत असलेल्या आलमगाव बीटमधील पोलिस हवालदार सय्यद आरेफोद्दीन शरीफोद्दीन असे लाच घेणाऱ्याचे नाव आहे.   

२०१४ या वर्षात शेख गफूर शेख बीबन यांनी त्यांचा मुलगा शेख अजीम शेख गफूर यांनी आत्महत्या केल्याने यातील तक्रारदार यांच्याविरुद्ध न्यायालयाकडून सीआरपीसी कलमनुसार अंबड येथे गुन्हा दाखल आहे. दरम्यान, पोलिस हवालदार सय्यद आरेफोद्दीन शरीफोद्दीन याने तक्रारदारास अटक न करण्यासाठी ४० हजार रुपयांची लाच मागितली. तडजोडीअंती १० हजार देण्याचे ठरले. परंतु तक्रारदारास लाच द्यायची नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्याला याबाबत माहिती दिली. यावरून तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना पोलिस हवालदाराला अंबड येथे पकडण्यात आले. 
बातम्या आणखी आहेत...