आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आष्टीत पोलिसांचा लॉजवर छापा: तीन युवतींसह चार तरुणांना पकडले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आष्टी - येथील उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या पथकाने शुक्रवारी रात्री पहाटे वाजता शहरातील सहारा लॉजवर अचानक छापा मारला. या छाप्यामध्ये तीन युवती, चार युवक अशा सात जणांना अश्लील चाळे करताना पकडले . या प्रकरणी सात युवक-युवतींसह लॉज व्यवस्थापक, एक कर्मचारी व दोन कला केंद्र चालक अशा ११ जणांवर शुक्रवारी आष्टी ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
आष्टी येथील प्रभारी उपविभागीय अधिकारी राजकुमार चाफेकर पोलिस निरीक्षक दिनेश आहेर यांनी सहारा हाॅटेलवर जामखेड येथील कला केंद्रावरील तीन तरुणींबरोबर पुण्यातील काही युवक अश्लील चाळे करत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीवरून पोलिसांनी पहाटे लॉजवर छापा टाकला. या छाप्यात गणेश लक्ष्मण शिंदे (३४), प्रवीण अनंता पवार (३०), संतोष कारभारी थोर (३७), विघ्नहर्ता निवृत्ती काळे (२५, सर्व रा. वडगाव तांदळ, ता. जुन्नर, जि. पुणे) यांच्यासह जामखेड येथील रेणुका कला केंद्रातील तीन युवतींना पकडले. पोलिसांनी सात जणांसह लॉज व्यवस्थापक, कर्मचारी, रेणुका कला केंद्राच्या चालक ज्योती पवार, अनिल पवार ११ जणांवर गुन्हा दाखल केला.
बातम्या आणखी आहेत...