आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिसांनी केली ४०० लिटर गावठी दारू नष्ट, तीन जणांना अटक, मलकापूरमध्ये कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खुलताबाद - तालुक्यातील मलकापूर परिसरातील डोंगररांगांमध्ये हातभट्टी दारू पाडण्याचे काम सर्रास सुरू आहे. यासंदर्भात खुलताबाद पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी डोंगर परिसरात शुक्रवारी छापा मारला. तेव्हा दोन ठिकाणी अवैधरीत्या दारू पाडल्याचे आढळून आले. पाडलेली ४०० लिटर गावठी दारू ताब्यात घेऊन पोलिसांनी सांडून देत नष्ट केली. या प्रकरणी तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

खुलताबाद तालुक्यातील वनक्षेत्र परिसरात तसेच डोंगररांगांमध्ये गावठी दारू पाडण्याचे अनेक अड्डे आहेत. यामधील मलकापूर गावहद्दीतील डोंगरात दारू तयार करण्यात येत असल्याची माहिती खुलताबाद पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक मनीषा लटपटे, विष्ण्ू चव्हाण, हणमंत सातपुते, गणेश काथार, भावसिंग जारवाल यंाच्या पथकाने दोन ठिकाणी शुक्रवारी छापा मारला. दोन्ही ठिकाणी प्रत्येकी दोनशे लिटर गावठी दारू आढळून आली. ती सांडून देत नष्ट करण्यात आली. या प्रकरणी पोलिसंानी संतोष पवार, कैलास सोनवणे, संजय मोरे यंाच्याविरुद्ध गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली. पुढील तपास खुलताबाद पोलिस करत आहेत.