आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस भरतीत पहिल्याच दिवशी 87 जण बाद

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - पोलिस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून 357 उमेदवार पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सोमवारी दाखल झाले होते. मात्र, काहींची उंची कमी होती, तर काहींना छाती फुगवता आली नाही. शिवाय, कागदपत्रांतील त्रुटी अशा विविध कारणांमुळे पहिल्याच दिवशी 87 उमेदवार अपात्र ठरले.

जिल्हा पोलिस दलातर्फे 56 पोलिस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. भरतीसाठी 3 हजार 200 उमेदवारांचे अर्ज दाखल झाले आहेत. पहिल्या दिवशी 500 उमेदवारांना बोलावण्यात आले होते. 357 उमेदवारांची 100 मीटर धावणे, उंची, छाती, गोळाफेक, लांब उडी व पुलअप्स चाचणी पूर्ण झाली. ही चाचणी पूर्ण करून 5 कि.मी.साठी होणारी चाचणी मंगळवारी सकाळी पोलिस मैदानावर होणार आहे.

दोन पोलिस निलंबित
बीड - सोमवारपासून मुख्यालयाच्या मैदानावर सुरू झालेल्या पोलिस भरती प्रक्रियेत शिस्तीचे पालन न केल्याचा ठपका ठेवत बंदोबस्तावरील पोलिस डी.एस. बळवंत व कोरडे या दोघांना पोलिस अधीक्षक दत्तात्रय मंडलिक यांनी निलंबित केले आहे. या ठिकाणच्या बंदोबस्तावरील शिवाजीनगर, पेठबीडचे चार पोलिस व ग्रामीणच्या दोन महिला पोलिसांना प्रत्येकी एक हजार रुपये दंडाच्या नोटिसा बजावल्या आहेत.