फर्दापूर - येथील वाघूर नदीपात्रात गावठी दारू तयार करणार्या हातभट्टीवर पोलिसांनी सोमवारी धाड मारून दोनशे लिटर रसायन व बारा लिटर गावठी दारू असा तीन हजार सहाशे रुपये किमतीचा माल जप्त केला आहे.
वाघूर नदी आहे. या नदी परिसरात अवैधरीत्या गावठी दारू पाडली जाते. त्यामुळे या भागातील बहुतांश युवक व वयोवृद्ध दारूच्या व्यसनाच्या आहारी गेल्याचे पाहावयास मिळत आहे. फर्दापूर हे गाव खान्देशच्या सीमेवर आहे. खान्देशमध्येही चोरट्या मार्गाने ही गावठी दारू सर्रास विक्री होते. मात्र, ही दारू विक्री थांबवण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी अनेक वेळा मागणी केली होती. पोलिस प्रशासन सतर्क झाले होते. त्यातून फर्दापूर परिसरात असलेली वाघूर नदीच्या पात्र अवैधरीत्या गावठी दारू पाडण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यामुळे पोलिसांनी सोमवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास छापा मारला.