आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘त्या’ वादग्रस्त पोलिस निरीक्षकाला हटवले

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लातूर - पोलिस ठाण्यात आलेल्या शिवसेनेच्या महिला पदाधिका-यांशी हुज्जत घालून त्यांना बेल्टने मारहाण करण्याचा आरोप असलेले वादग्रस्त पोलिस निरीक्षक बाळासाहेब देशमुख यांना शिरूर अनंतपाळ ठाण्यातून हटवण्यात आले आहे. जिल्हा विशेष शाखेतील साहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान धबडगे यांच्याकडे ठाण्याचा कार्यभार तात्पुरत्या स्वरूपात देण्यात आला आहे.
दरम्यान, देशमुख हे ठाण्यामध्ये दारूच्या अंमलाखाली होते की नाही याचा तपशील उघड झालेला नाही. त्यांनी दारू पिऊन त्या नशेतच आपल्याला मारहाण केली, अशी तक्रार शिवसेनेच्या महिला आघाडी प्रमुख डॉ.शोभा बेंदरगे यांनी रविवारी केली होती. उपविभागीय पोलिस अधिकारी विठ्ठल गिते हे या प्रकरणाची चौकशी करीत आहेत. गिते यांनी सांगितले की देशमुख याच्या रक्ताचे नमुने औरंगाबादला पाठवण्यात आले आहेत. ते आल्यानंतरच पुढील कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, पोलिस निरीक्षक देशमुख यांनी डॉ. बेंदरगे यांना केलेल्या मारहाण प्रकरणी त्यांच्यावर अदखलपात्र गुन्हा नोंदवण्यात आला आहे. तर देशमुख यांच्या तक्रारीवरून बेंदरगे यांच्या विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.