आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलामांच्या भेटीसाठी एपीआयची आत्महत्या; लातूरमधील घटना; सुसाइड नोटवरून खुलासा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर- ‘मी डॉ. कलाम साहेबांना भेटावयास जात आहे’ अशी सुसाइड नोट लिहून येथील सेवानिवृत्त सहायक पोलिस उपनिरीक्षकाने घराशेजारच्या आंब्याच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली.

जयराम गणपती कांबळे (७०) असे त्यांचे नाव आहे. सोमवारी जयराम यांचे जावई मनोज ठोसरे यांनी फिर्याद दिल्यावरून गांधी चौक पोलिस ठाण्यात या प्रकरणाची अकस्मात मृत्यू अशी नोंद झाली आहे. जयराम यांनी रविवारी रात्री घरासमोरील आंब्याच्या झाडास गळफास घेतला. सकाळी ही बाब त्यांच्या कुटुंबीयांच्या लक्षात आली.‘ मी समाधानी, आनंदी आहे’ असेही जयराम यांनी चिठ्ठीत लिहिले होते.

जयराम यांनी लातूर जिल्ह्यातील विविध पोलिस ठाण्यांत सेवा बजावली होती. ते नेहमी गांधी टोपी परिधान करायचे, असे पोलिस निरीक्षक गजानन भातलवंडे यांनी सांगितले.
बातम्या आणखी आहेत...