आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Police Van Accident At Sonkhed 14 Police Injuerd

सोनखेडजवळ पोलिस व्हॅनला अपघात; 14 पोलिस कर्मचारी जखमी, दोघे गंभीर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड- नांदेड-लोहा मार्गावरील सोनखेडजवळ पोलिस मुख्यालयाच्या व्हॅनला (एमएच 26 आर 236) अपघात होऊन 14 पोलिस कर्मचारी जखमी झाले. जखमींपैकी दोघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना शहरातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.
पोलिस मुख्यालयातील 14 कर्मचारी शुक्रवारी सकाळी बंदोबस्तासाठी लोहा येथे जात होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास सोनखेडजवळील मोरगे पेट्रोल पंपाजवळ पोलिस व्हॅन डगमगू लागली. त्यामुळे चालक दत्तात्रय रामजी मंगनाळे यांनी ब्रेक दाबला. ब्रेक दाबल्यानंतर व्हॅन उलटली. यात व्हॅनमधील कर्मचारी जखमी झाले. अंकुश बालाजी पवार व नामदेव पंडित कदम या दोघांच्या डोक्याला मार लागल्यामुळे त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उर्वरित जखमींवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात उपचार करण्यात आले. या अपघाताची माहिती मिळताच जिल्हा पोलिस अधीक्षक विठ्ठलराव जाधव यांनी रुग्णालयात जाऊन जखमींची विचारपूस केली.