आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, R.r.patil Rally In Paithan, Divya Marathi

हंगामी पोलिस पाटलांना सेवेमध्ये कायम करू- आर. आर. पाटील प्रतिपादन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पैठण- पोलिस पाटील हा गावपातळीवर महत्त्वाचा घटक आहे. राज्य सरकार व गावामधील तो दुवा आहे. तसेच काही वर्षांपूर्वी पोलिस पदावरून कमी करण्यात आलेल्या व ज्यांनी तीन वर्षे पोलिस पाटिलकी केली आहे. त्या हंगामी पोलिस पाटलांना सेवेमध्ये कायम ठेवण्यात येईल, असे प्रतिपादन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी केले. पैठण येथे आयोजित पोलिस पाटलांच्या राज्यव्यापी अधिवेशनात ते बोलत होते.


या वेळी माजी मंत्री अनिल पटेल, आमदार संजय वाघचौरे, विनोद पाटील, शिवाजी नरवडे, फकीरचंद घेवारे, द्वारकाबाई खडसन, दिलीप वाघ, दिनकर एडके आदी उपस्थित होते. पाटील पुढे म्हणाले की, ज्या पोलिस पाटलाचा कर्तव्यावर असताना मृत्यू झाला अथवा हत्या झाल्यास त्यांना विम्याचे संरक्षण देऊन त्यांच्या मुलांना शासकीय सेवेत समावून घेतले जाईल. तसेच त्यांना योग्य तो सन्मान पोलिस ठाणे, तहसील कार्यालयात द्यावा. यासंदर्भात संबंधितांना सूचना देण्यात येतील. पोलिस पाटलांकडून मागणी आल्यास त्यांना संरक्षण देऊ, असे सांगत ते म्हणाले की, माझ्या कार्यकाळात पोलिस पाटलांच्या मानधनात सर्वाधिक वाढ झाली आहे. त्यांचे मानधन आठशे रुपयांवरून थेट तीन हजार रुपये करण्यात आले आहे. मात्र, ती रक्कमही तोकडी असल्याने मानधनात वाढ करण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.

संघटनेच्या मागण्या
पोलिस पाटील हे कर्तव्य बजावत असताना त्यांचा मृत्यू झाल्यास त्यांना शहीद म्हणावे. तसेच 10 हजार रुपये मानधन देण्यात यावे. कर्तव्य बजावत असताना मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत द्यावी, असे नमूद करण्यात आले आहे.