आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Political News In Marathi, Ramdas Athawale Speaking At Rally, Divya Marathi

युती करेल आघाडी सरकारची माती : खासदार आठवले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शिवना- काँग्रेस पक्ष हा जातीयवादी आहे. या पक्षात रिपब्लिकन पार्टीचा नुसता वापर करण्यात आला. त्यामुळे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचे तोल-मोल असलेल्या भाजप, शिवसेनेसोबत महायुती करण्याचा निर्णय घेतला. आता युती आघाडीची माती करेल, असे प्रतिपादन खासदार तथा रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी शिवना येथे आयोजित मेळाव्यात केले.

आरपीआयचे राष्ट्रीय अध्यक्ष आठवले यांची राज्यसभेवर खासदारपदी निवड झाल्याबद्दल शिवना येथे गुरुवारी महायुतीतर्फे भव्य सत्कार सोहळा तसेच महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. आघाडी सरकारने महागाईचा पाया रचला, त्यामुळे सामान्य माणूस होरपळला जात आहे. या जातीयवादी आघाडी सरकारची पाळेमुळे खोदून काढणे गरजेचे असल्याचे आठवले यांनी या वेळी सांगितले. दलित मतांचा वापर आघाडी सरकारने स्वार्थासाठी केला असल्याचा आरोप त्यांनी या वेळी केला. महायुतीच आघाडी सरकारची माती करेल, अशी खरमरीत प्रतिक्रियाही त्यांनी दिली. गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना पंतप्रधापदाच्या खुर्चीवर बसवायचे असेल, तर महायुतीसोबत जाण्याची गाठ मनाशी बांधून घ्या, असा सल्ला खासदार रावसाहेब दानवे यांनी आपल्या भाषणात दिला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कार्याध्यक्ष बाबूराव कदम हे होते, तर खासदार रावसाहेब दानवे, किसान युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष मकरंद कोर्डे, मिलिंद शेळके, दौलत खरात, भाजपचे सुरेश बनकर आदींची प्रमुख उपस्थिती होती. मेळाव्यासाठी संजय साळवे, सलीम कुरैशी, कासाबाई जगताप, संतोष सिरसाट, भीमराव दांडगे आदींनी पुढाकार घेतला.